नोकरावर ठेवला अतिविश्‍वास मग झाले असे...

The mistrust of the servant was then ...
The mistrust of the servant was then ...
Updated on

नागपूर : बॅंकेतून पैसे काढून आणण्यासाठी पाठविलेल्या नोकराने हॉटेलमालकाचे 8 लाख 55 हजार रुपये घेऊन पोबारा केला. रात्री उशिरापर्यंत नोकर न परतल्याने तो पळून गेल्याची बाब लक्षात आली. हॉटेल मालकाच्या तक्रारीवरून गणेशपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. तसेच आरोपी नोकराला पोलिसांनी उत्तर प्रदेशातील लखनऊ शहरातून अटक केली. या नोकराच्या ताब्यातून पोलिसांनी 4 लाख 94 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

राजकुमार शांतीलाल गुप्ता ऊर्फ हेमंत शांतीलाल गोयल (53) रा. राजाजीपुरम, लखनौ (उ.प्र.) असे आरोपी नोकराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजकुमार ऊर्फ हेमंत हा ग्रेट नाग रोडवरील हॉटेल तोयबा येथे स्वागत कक्षात कार्यरत होता. हॉटेल तोयबा येथे येण्यापूर्वी तो पुणे येथे कामाला होता. 19 ऑगस्ट 2019 रोजी दुपारी एकच्या सुमारास हॉटेलमालक अफजल अबुबकर मिठ्ठा (42, रा. एम्प्रेस रेसिडन्सी बिल्डिंग, शुक्रवारी तलाव) यांनी राजकुमार यास एक धनादेश देऊन एचडीएफसी बॅंकेकडून पैसे आणण्यास सांगितले. राजकुमारने एचडीएफसी बॅंकेत धनादेश वटवून 8 लाख 55 हजार रुपये काढले आणि हॉटेलमध्ये न जाता पैसे घेऊन त्याने पोबारा केला. याप्रकरणी गणेशपेठ पोलिसांनी 408 अन्वये गुन्हा दाखल केला होता. पैसे घेऊन पळाल्यानंतर तो इंदौर, पुणे, जबलपूर येथे फिरत राहिला. सातत्याने त्याचे लोकेशन बदलत असल्याने तो पोलिसांना मिळून येत नव्हता. दरम्यान, त्याने त्याच्यावर ?पेंडिक्‍?स आणि जबड्‌याची शस्त्रक्रिया करून घेतली. तसेच चोरीच्या पैशातून त्याने सोन्याचे दागिने, मोबाईल, मनगटी घड्‌याळ खरेदी केली.


काही दिवसांपूर्वी तो लखनऊ येथे गेला. राजाजीपुरम येथे विनोदकुमार श्रीवास्तव यांच्याकडे खोली घेऊन तो किरायाने राहत होता. राजकुमार लखनऊ येथे असल्याची माहिती समजताच गणेशपेठ पोलिसांचे पथक लखनऊला गेले. 28 आणि 29 फेब्रुवारीच्या मध्यरात्री त्याला ताब्यात घेऊन नागपूरला आणले. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून सोन्याचे दागिने, मोबाईल, 25 हजारांची मनगटी घड्‌याळ आणि रोख 40 हजार रुपये असा 4 लाख 94 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही कामगिरी हवालदार पंकज बोराटे, संतोष टेकाम, चंदू ठाकरे आणि शरद चांभारे यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com