esakal | मॉन्सूनची वाटचाल योग्य दिशेने, या तारखेला होणार विदर्भात दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

The monsoon will arrive in Vidarbha by June 15

मॉन्सून सध्या कर्नाटक, आंध्र प्रदेश व तेलंगणमध्ये सक्रिय असून, त्या भागांत जोरदार पाऊस सुरू आहे. मॉन्सूनच्या प्रगतीसाठी अनुकूल वातावरण असल्याने येत्या 48 तासांत कोकणात दाखल होण्याची दाट शक्‍यता आहे.

मॉन्सूनची वाटचाल योग्य दिशेने, या तारखेला होणार विदर्भात दाखल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : मॉन्सूनची वाटचाल योग्य दिशेने सुरू असल्यामुळे विदर्भात येत्या 15 जूनपर्यंत मॉन्सूनचे आगमन अपेक्षित आहे. तसे संकेत प्रादेशिक हवामान विभागाने दिले आहेत. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने शुक्रवारपासून विदर्भात जोरदार वादळी पावसाचीही दाट शक्‍यता आहे.

हवामान विभागाचे संचालक मोहनलाल साहू यांनी दिलेल्या माहितीनुसार, मॉन्सून सध्या कर्नाटक, आंध्र प्रदेश व तेलंगणमध्ये सक्रिय असून, त्या भागांत जोरदार पाऊस सुरू आहे. मॉन्सूनच्या प्रगतीसाठी अनुकूल वातावरण असल्याने येत्या 48 तासांत कोकणात दाखल होण्याची दाट शक्‍यता आहे. मॉन्सूनची वाटचाल पुढेही कायम राहिल्यास दोन-तीन दिवसांत विदर्भात धडक देण्याची शक्‍यता आहे.

विदर्भात आता आणखी एक कोळसा खाण, वाढणार कोळसा उत्पादन

त्यामुळे 15 जूनच्या आसपास मॉन्सूनचे विदर्भात आगमन अपेक्षित आहे. तथापि मॉन्सूनच्या मार्गात अडथळा आल्यास आगमनाला थोडा विलंबही होऊ शकतो. त्यामुळे मॉन्सूनसंदर्भात दोन दिवसानंतरच निश्‍चितपणे सांगता येईल, असेही ते म्हणाले. दरम्यान, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टयामुळे विदर्भात "वीकेंड'पर्यंत जोरदार मॉन्सूनपूर्व वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. शुक्रवारी व शनिवारी काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची दाट शक्‍यता आहे. मॉन्सूनच्या वाटचालीसाठीही ही अनुकूल स्थिती असल्याचे सांगण्यात आले.

go to top