आयुक्त मुंढेंविरोधातील अविश्‍वासाचा प्रस्ताव फेटाळला

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 जून 2020

सभा स्थगित करण्यापूर्वी शिवसेनेच्या नगरसेविका मंगला गवरे यांनी आयुक्तांमुळे प्रभागातील विकास कामे थंडबस्त्यात गेली असून नागरिक त्रास देत असल्याचे सांगितले. आयुक्तांमुळे मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे नमुद करीत त्यांनी यावर चर्चेचा स्थगन प्रस्ताव दिला.

नागपूर : कॉंग्रेस सदस्य संजय महाकाळकर यांनी स्थगनद्वारे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर अविश्‍वासाचा प्रस्ताव दिला. मात्र, महापौरांनी हा अहवाल फेटाळला. परंतु, शिवसेनेच्या सदस्य मंगला गवरे व कॉंग्रेस सदस्य नितीन साठवणे यांनी आयुक्तांच्या कार्यपद्धतीवर स्थगनद्वारे दिलेला चर्चेचा प्रस्ताव मान्य करीत यावर मंगळवारी चर्चा होईल, असे महापौरांनी सभागृहात स्पष्ट केले. 

सभा स्थगित करण्यापूर्वी शिवसेनेच्या नगरसेविका मंगला गवरे यांनी आयुक्तांमुळे प्रभागातील विकास कामे थंडबस्त्यात गेली असून नागरिक त्रास देत असल्याचे सांगितले. आयुक्तांमुळे मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे नमुद करीत त्यांनी यावर चर्चेचा स्थगन प्रस्ताव दिला. कॉंग्रेसचे सदस्य नितीन साठवणे यांनीही आयुक्तांनी कोरोनाच्या नावावर एकतर्फी निर्णय घेतल्याचे सांगितले. 

हेही वाचा : पतीसोबत अश्‍लील वर्तन करण्यास बाध्य केले; नंतर व्हिडिओ व्हायरल करण्याची दिली धमकी 

नगरसेवकांवर गुन्हा दाखल केला. लोकप्रतिनिधींची कामे होत असून त्यांना गुन्ह्यात अडकविले जात असल्याचे सांगत त्यांनीही यावर चर्चेसाठी स्थगन प्रस्ताव दिला. याशिवाय माजी विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर यांनी नगरसेवकांवर गुन्हा दाखल करणाऱ्या आयुक्तांविरोधात अविश्‍वास ठराव मांडण्यात यावा, असे महापौरांना पत्र दिले. परंतु एका सभेत एकच स्थगन प्रस्तावावर चर्चा शक्‍य आहे. त्यामुळे अविश्‍वासाचा प्रस्ताव महापौरांनी फेटाळला. मंगला गवरे आणि नितीन साठवणे या दोघांचा प्रस्ताव एकाच विषयावर असल्याने मंगळवारी चर्चा होईल, असे महापौरांनी स्पष्ट केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The motion of no confidence was rejected