हॅलोऽऽ हॅलोऽऽ, तुकाराम मुंढे यांच्या तावडीतून कसे सुटायचे, सांगता का?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

महापालिकेत आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांनी कर्मचारी व अधिकाऱ्यांना कपड्यापासून तर दाढीपर्यंत शिस्त लावणे सुरू केले आहे. गेल्या दहा दिवसांत आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीला मनपातील अधिकारी व कर्मचारी चांगलेच कंटाळले आहेत. त्यांच्यापासून सुटका कशी करावी याचा विचार कर्मचारी करीत असून, एकमेकांना फोन लावणे सुरू असल्याचे समजते. 

नागपूर : महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी सध्या नाशिक महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या संपर्कात अधिक दिसून येत असल्याची बाब पुढे आली आहे. आयुक्त तुकाराम मुंढे सव्वा वर्ष नाशिक महापालिकेत असल्याने येथील कर्मचारी नाशिक कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून त्यांच्याबाबत माहिती घेत असल्याचे सुत्राने नमुद केले. एवढेच नव्हे आयुक्त मुंढे यांच्या तावडीतून कसे सुटायचे? याबाबतही विचारणा केली जात असल्याचे समजते. 

महापालिकेत आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांनी कर्मचारी व अधिकाऱ्यांना कपड्यापासून तर दाढीपर्यंत शिस्त लावणे सुरू केले आहे. आयुक्त तुकाराम मुंढे हे सव्वा वर्ष नाशिक महापालिकेत होते. त्यांची कार्यपद्धत तेथे चांगलाची गाजली. आयुक्तांच्या सव्वा वर्षाच्या नाशिकमधील कामाचा आढावा महापालिकेच्या अधिकारी व कर्मचारी घेत आहेत. 

नागपूर येथील कर्मचारी व अधिकारी नाशिकच्या लोकप्रतिनिधींसह महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना थेट भ्रमणध्वनीच्या माध्यमातून मुंढे यांची काम करण्याची पद्धत व त्यातून सुटका करून घेण्यासाठीचा मार्ग कोणता, याबाबत विचारणा करीत आहे. नाशिक मनपातील एका कर्मचाऱ्याने तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाच मार्ग कसा काढायचे हे विचारा, असे उत्तर देऊन वेळ मारून नेल्याचे सुत्राने नमुद केले आहे. 

अधिक माहितीसाठी - मुख्याध्यापिका पत्नी करायची मारहाण, अपमान असह्य झाल्याने पतीचा राग झाला अनावर...

कामकाजाच्या पद्धतीमुळे नागरिकसुद्धा तुकाराम मुंढे यांच्या विरोधात गेल्याने त्याचा फायदा घेत त्यांच्यावर अविश्‍वास ठरावाचा प्रस्ताव दाखल करण्याचा नाशिकमध्ये प्रयत्न करण्यात आला; परंतु तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची नाचक्की होईल म्हणून स्थानिक पातळीवर महापौरांशी चर्चा करून प्रस्ताव मागे घेण्यास भाग पाडले. त्यामुळे तेथील कर्मचारी एकप्रकारे माजी मुख्यमंत्र्यांवरही रोष व्यक्त करीत असल्याचे एका कर्मचाऱ्याने नमुद केले आहे. 

अधिकारी, कर्मचारी कंटाळले

तुकाराम मुंढे यांच्या कामकाजाची पद्धत कशी आहे? त्यावर कशी मात केली? असे प्रश्‍न मनपातील कर्मचारी व अधिकारी नाशिक मनपातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना विचारत आहेत. यावरून गेल्या दहा दिवसांत आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीला मनपातील अधिकारी, कर्मचारी कंटाळल्याचे चित्र आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Municipal employees suffer due to Tukaram Mundhe