esakal | ‘गेम’ करण्याची धमकी दिल्यामुळे दगडाने ठेचून कुख्यात गुंडाचा खून
sakal

बोलून बातमी शोधा

The murder of a don crushed by a stone

गुरुवारी दुपारी दोघांनी परिसरात असलेल्या देशी दारूच्या दुकानातून मोठी बाटली विकत घेतली. दोघांनी मैदानात बसून दारू ढोसली. नशा चढल्यानंतर शैलेशने राकेशला ठार मारण्याची धमकी दिली. त्यामुळे राकेश चिडला आणि त्याने शिवीगाळ केली. दोघांत लगेच मारामारी झाली. ‘मेरी दारू उतरने के बाद तेरा मर्डर कर दूंगा’ अशी धमकी दिली.

‘गेम’ करण्याची धमकी दिल्यामुळे दगडाने ठेचून कुख्यात गुंडाचा खून

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : कपिलनगर परिसरातील आवळेनगरात एका कुख्यात गुंडाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. हे हत्याकांड गुरुवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास उघडकीस आले. शैलेश ऊर्फ वाघ्या देशभ्रतार (३२) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. ‘गेम’ करण्याची धमकी दिल्यामुळे स्वतःच्या जीवाच्या भीतीपोटी आरोपीने ‘खेल’ केल्याची माहिती समोर आली आहे. राकेश मोहनलाल पटले (३२) असे मारेकऱ्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शैलेशने २००८ मध्ये जरीपटका ठाण्याच्या हद्दीत एका गुंडाचा खून केला होता. या हत्याकांडात तो कारागृहात बंद होता. जेलमधून सुटून आल्यानंतर त्याने परिसरात दहशत निर्माण केली. कुख्यात शैलेश हा वाघ्या दादा नावाने ओळखला जाऊ लागला. आरोपी राकेश आणि वाघ्या हे दोघे मित्र होते. दोघेही पेंटिंगची कामे करीत होते. पैसे मिळताच दोघेही दारू पीत बसत होते.

सविस्तर वाचा -  Video गावाचा सुपुत्र निघाला आर्मीत; गावकऱ्यांनी दिला आगळावेगळा निरोप

गुरुवारी दुपारी दोघांनी परिसरात असलेल्या देशी दारूच्या दुकानातून मोठी बाटली विकत घेतली. दोघांनी मैदानात बसून दारू ढोसली. नशा चढल्यानंतर शैलेशने राकेशला ठार मारण्याची धमकी दिली. त्यामुळे राकेश चिडला आणि त्याने शिवीगाळ केली. दोघांत लगेच मारामारी झाली. ‘मेरी दारू उतरने के बाद तेरा मर्डर कर दूंगा’ अशी धमकी दिली.

शैलेंश आपल्याला ठार मारणार या भीतीपोटी राकेशने बाजूला पडलेला दगड उचलला आणि शैलेशच्या डोक्यावर मारला. नशेत असल्यामुळे तो खाली कोसळला. त्यामुळे राकेशने त्याचा दगडाने ठेचून खून केला. घटनेची माहिती मिळताच कपिलनगर पोलिस घटनास्थळावर पोहचले. डीसीपी निलोत्पल यांनी घटनेची माहिती घेतली. फरार झालेला आरोपी राकेश शहरातून पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. मात्र, डीसीपी पथकाने सापळा रचून त्याला अटक केली.

संपादन - नीलेश डाखोरे

go to top