मित्राचे काकूशी अनैतिक संबंध; रंगेहात पकडल्याने केला खून

अनिल कांबळे
Tuesday, 8 September 2020

मार्च २०२० मध्ये मीनाक्षीचे पती गावी गेले होते. तर गोलू नागपूरला मामाकडे आला होता. मीनाक्षीने रामाला दुपारी घरी बोलावले. दरम्यान, गोलू नागपूरवरून अचानक घरी परतला. त्याला काकू आणि मित्र नको त्या अवस्थेत दिसले. त्याने रामाला वखराच्या काठीने जबरदस्त धुलाई केली होती.

नागपूर : घरात कुणीही नसताना मित्राला काकूसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करताना रंगेहात पकडल्यानंतर त्याची धुलाई केली. त्याचा वचपा काढण्यासाठी त्याने दोघांच्या मदतीने मित्राचा काटा काढला. या हत्याकांडात लकडगंज पोलिसांनी पाच महिन्यांनंतर तीन आरोपींना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कामठी तालुक्यातील अंबाडी पोलिस ठाण्याअंतर्गत एका गावातील गोलू या युवकाला दारू आणि जुगाराचे व्यसन होते. गावातील रामा मेश्राम हा त्याचा मित्र होता. दोघेही सोबतच दारू आणि जुगार खेळायला बाहेरगावी जात होते. रामाचे गोलूची ३० वर्षीय काकू मीनाक्षी (बदललेले नाव) हिच्याशी २०१७ मध्ये सूत जुळले. मीनाक्षीचा पती शेतीवर गेल्यानंतर रामा घरी येत होता आणि शारीरिक संबंध प्रस्थापित करीत होता.

अधिक माहितीसाठी - इम्युनिटी ठेवा मजबूत, व्यायाम करा टाइट  तरच कोरोनाशी फाईट; डॉक्टर म्हणतात हे करा आणि वाढवा इम्युनिटी

मार्च २०२० मध्ये मीनाक्षीचे पती गावी गेले होते. तर गोलू नागपूरला मामाकडे आला होता. मीनाक्षीने रामाला दुपारी घरी बोलावले. दरम्यान, गोलू नागपूरवरून अचानक घरी परतला. त्याला काकू आणि मित्र नको त्या अवस्थेत दिसले. त्याने रामाला वखराच्या काठीने जबरदस्त धुलाई केली होती.

असा रचला कट

प्रेयसीसमोर धुलाई केल्यामुळे रामा खूप चिडला होता. त्याने वचपा काढण्यासाठी गोलूचा गेम करण्याचा कट रचला. रामाने गावातील मित्र हर्षल मेश्राम (२०) आणि शुभम भगत (२३) यांना सोबत घेतले. गोलूने गावातील एका मुलीशी प्रेमविवाह केला होता. पत्नीला घेऊन तो एक जुलैला नागपुरात नातेवाईकाकडे आला. तो दारू पिण्यासाठी इतवारी रेल्वे स्टेशनच्या शेवटच्या मालधक्क्यावर आला. त्यावेळी तिन्ही आरोपींनी त्याचा गळा आवळून खून केला.

अधिक वाचा - ग्राहकांनो खुशखबर! सोने- चांदीच्या भावात तब्बल इतक्या हजारांची घसरण; खरेदीसाठी ‘अच्छे दिन'

असा झाला भंडाफोड

पाच महिन्यांनंतर गावातील एका युवकाने पीएसआय एस. व्ही. राऊत, हवालदार भोजराज बांते, प्रदीप सोनटक्के, अभिषेक शनवारे आणि यशवंत डोंगरे यांना गुप्त माहिती दिली. त्याआधारे रामाला अटक केली. त्याला खाक्या दाखवताच कबुली दिली आणि अन्य आरोपींची नावे सांगितली.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Murder of a friend after an affair with Kaku