दोघा जीवलग मित्रांत दारू पिताना झाला वाद, आणि नंतर मात्र जीवावरच बेतले...

 सावनेर   : घटनास्थळाचा पंचनामा करताना पोलिस.
सावनेर : घटनास्थळाचा पंचनामा करताना पोलिस.

सावनेर (जि.नागपूर) : ते दोघेही जिवलग मित्र...कुठूनतरी दारू आणून एका निर्जन ठिकाणी दारू पित बसले. क्षुल्लक कारणावरून दोघांतही वाद झाला. वाद विकोपाला गेला अन्‌ रागाच्या भरात एका मित्राने दुस-या मित्राला दगडाने ठेचून त्याची हत्या केली. मृतदेह उसाच्या शेतात फेकण्यात आला. ही घटना सावनेर रोडवरील गुजरखेडी बायपास रोडवर रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांना उसाच्या शेताच्या धुऱ्यावर मृतदेह पडून असल्याचे आढळून आल्याने खळबळ उडाली.

कारणीभूत ठरला क्षुल्लक वाद
उद्देश प्रेमदास बागडे (वय 22, वाघोडा वॉर्ड क्र.2, गुजरखेडी नवीन वस्ती) असे मृताचे नाव तर सारंग वासुदेव अनासपुरे (वय 26, हॉटमेंट कॉलनी वाघोडा खाण) असे आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार उद्देश हा बांधकाम मिस्त्रीचे काम करीत होता. त्याचा मित्र सारंग अनासपुरे हा शहरात इलेक्‍ट्रिशियनचे काम करतो. शनिवारी (ता.9) रात्री साडेनऊच्या सुमारास उद्देश व सारंग हे सावनेर खापा रोड गुजरखेडी बायपासवरील पुलावर बसून दारू पीत होते. दरम्यान, नशेत असताना कशावरून तरी दोघांमध्ये वाद झाला. वाद इतका विकोपाला गेला दोघेही एकमेकांवर मारण्याच्या उद्देशाने धावले.


मृतदेह फेकला उसाच्या शेतात
सागरला तिथे दगड पडलेला दिसला. सारंगने दगड उचलून उद्देशच्या डोक्‍यात हाणला. यात उद्देशचा घटनास्थळीच मृत्यू झाला. सारंगने त्याला ओढत बापूरावजी सावरकर यांच्या उसाच्या शेतात नेऊन धुऱ्यावर टाकले. सकाळी घटना उघडकीस आल्यानंतर लगेच सावनेर पोलिसांनी सूत्रे हलविली. स्थानिक गुन्हे शाखेने मोबाईल घटना तारीख, वेळेच्या लोकेशनवरून आरोपीच्या बारा तासाच्या आत मुसक्‍या आवळून सावनेर पोलिसांच्या ताब्यात दिले. या कारवाईत सावनेर पोलिस अधिकारी अशोक कोळी, पोलिस कर्मचारी, स्थानिक गुन्हे शाखेचे सपोलिस निरीक्षक जितेंद्र वैरागडे, पीएसआय गौरखेडे, जावेद शेख, बाबा केचे, पोलिस हवालदार गडेकर आदी सहभागी होते. पुढील तपास एपीआय सतीश पाटील करीत आहेत. या घटनेमुळे अनेक शंका-कुशंका व्यक्‍त करण्यात येत आहे. लॉकडाउन असूनही त्यांच्याकडे दारू कुठून आली, असा प्रश्‍न उपस्थित करण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com