दारूच्या मैफिलीत तिघांमध्ये झाला वाद, दोघे संतापले आणि...

Murder of a friend over an alcohol dispute
Murder of a friend over an alcohol dispute

मोवाड (जि. नागपूर) : बाजाराचा दिवस असल्याने तिघांनी चांगली कमाई केली. दिवसभराचा थकवा काढण्यासाठी त्यांनी रात्री बैठक घेण्याचे ठरविले. ठरल्याप्रमाणे रात्री तिघेही एकत्र आले. गप्पा गोष्टी करीत एक एक पॅक रिचवणे सुरू केले. जसजशी दारू चढत होती तसतसा गप्पांचा फडही रंगत होता. पॅक वर पॅक रिचवल्यानंतर क्षुल्लक कारणावरून त्यांच्यात बिनसले. वाद वाढत गेला. दोघे एक विषय धरून होते. तर तिसरा आपल्या मुद्यावर ठाम होता. एकट्याच्या वेगळ्या बोलण्याने दोघे संतापले आणि बाजूला पडून असलेली वीट, फावडे आणि बांबूने त्याच्यावर वार करणे सुरू केले. दारूच्या नशेत आपण आपल्या जीवलग मित्राला मारत असल्याचे भान त्यांना राहिले नाही आणि मारहाणीतच एका मित्राचा मृत्यू झाला. रामा बानाईत असे मृताचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नरखेड पोलिस ठाण्याअंतर्गत मोवाड येथे बुधवारी रात्री (ता. 1) रामा बनाईत (वय 45) रा. मोवाड याच्या घरी गजेंद्र बडघरे (52) व उमेश जैन (28) दोघेही रा. मोवाड हे तिघेही दारू पीत बसले होते. काही क्षुल्लक कारणावरून तिघांमध्ये बाचाबाची झाली. त्यात गजेंद्र व उमेश याचा राग अनावर झाला. रागाच्या भरात गजेंद्र व उमेश यांनी रामा बनाईत याला विटा, फावडे व बांबूने चांगलेच बदडले. रक्तबंबाळ होऊन रामा बनाईतचा जागीच गतप्राण झाला.

आपल्या हातून मित्राचा खून झाल्याचे लक्षात येताच आरोपी गजेंद्र बडघरे व उमेश जैन यांनी आठवडी बाजारातून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच मोवाड पोलिस चौकीचे शैलेश डोंगरदिवे व नीलेश खरडे यांनी आरोपींना ताब्यात घेतले. नरखेड पोलिस स्टेशनचे ठाणेदार मल्लिकार्जुन इंगळे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करण्यापूर्वीच खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना गजाआड केले. याप्रकरणी नरखेड पोलिसांनी दोन्ही आरोपींवर गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास नरखेड पोलिस करीत आहेत. मृताच्या पत्नीच्या दहा वर्षांपूर्वी जळून मृत्यू झाला होता. त्याला 15 वर्षांची मुलगी व 11 वर्षांचा मुलगा आहे. मुलांच्या डोक्‍यावरून आई-वडील दोघांचेही छत्र हरवल्याने परिसरात हळहळ व्यक्‍त केली जात होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com