
खापरखेडा(जि. नागपूर) : खापरखेडा पोलिस स्टेशन हद्दीतील चनकापूर-वलनी रोडवर मंगळवारी दुपारच्या सुमारास बेसबाॅलच्या दंड्याने युवकावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात त्या युवकाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली.
मोबिन अब्दुल लतीफ खान (२४) रा.वलनी असे मृतकाचे नाव आहे. या हत्येप्रकरणी रोशनकुमार साहनी, राजाबाबू अंसारी, सोहैल अंसारी, इलू अंसारी या चार आरोपींना अटक करण्यात आली असून लईक अंसारी फरार आहे. सर्व आरोपी वलनी येथे राहतात.
सदर घटनेतील मृतकाने आरोपीच्या परिवारा संबंधित काही माहिती व्हायरल केल्याने जुन्या वैमनस्यातून बेसबाॅलच्या दंड्याने मारपीट करुन हत्या करण्यात आली. दरम्यान मृतकाच्या मोबाईलमध्ये सापडलेल्या रेकाॅर्डिंग नुसार मृतक मोबिन हा एका मुलींशी संवाद करीत होता.याची इंत्यभुत माहिती मिळाल्यावर १५ आॅगस्ट रोजी आरोपी अंसारी परिवाराने मृतकाला चांगलेच बदडले होते.आणि त्या मुलीपासून दूर राहण्यास सांगितले होते. अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
सविस्तर वाचा - नागपूरचे मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांची तडकाफडकी मुंबईत बदली
घटने पश्चात मृतक मोबिन हा आपल्या मुळ गावी उत्तरप्रदेश येथे जाण्याची तयारी करीत होता. परंतू मंगळवारीच मृतक मोबिनने त्या मुलीला पुन्हा फोन केला होता.याची माहिती आरोपींना कळली यावरुन संतप्त झालेल्या आरोपींनी झुला लाईन चनकापुर-वलनी रोडवर मृतक मोबीनला पकडले. त्याला बेसबाॅल ,हाॅकीच्या दंड्याने मारहाण केली.यात मोबीन गंभीर जखमी झाला.घटनेची माहिती जखमींच्या परिवाराला मिळताच त्याला नागपूर येथे एका खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले.मध्यरात्रीच्या सुमारास त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
संपादन - स्वाती हुद्दार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.