नागपूर जिल्ह्यातील आमदारांची संख्या माहिती आहे का?

Nagpur became the district of MLAs
Nagpur became the district of MLAs

नागपूर : नागपूर जिल्ह्याचे अनेक वैशिष्ट्ये आहेत. त्यात भाजपचे विधान परिषदेचे उमेदवार प्रवीण दटके निवडून आल्यानंतर आमदारांचा जिल्हा अशी नवी ओळख मिळणार आहे. त्यांच्यामुळे नागपूर जिल्ह्यातील विधानसभेसह आमदारांची संख्या तब्बल वीसवर पोहोचणार आहे.

नागपूर जिल्ह्यात एकूण बारा विधानसभा मतदारसंघ आहेत. याशिवाय जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी विधान परिषदेची एक जागा आहे. सध्या गिरीश व्यास या मतदारसंघाचे आमदार आहेत. पदवीधर मतदारसंघावर अनेक वर्षांपासून नागपूरचेच वर्चस्व आहे. विद्यमान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची राजकीय कारकीर्द या मतरासंघामुळे बहरली.

सध्या या मतदारसंघाचे नेतृत्व अनिल सोले करीत आहेत. शिक्षण मतदारसंघावरही अनेक वर्षांपासून नागपूरचाच दबदबा आहे. नागोराव गाणार दुसऱ्यांदा या मतदारसंघातून निवडून आले आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी भंडारा-गोंदिया विधान परिषदेच्या संघात नागपूरच्या परिणय फुके यांना पाठविले होते. अतिशय अवघड वाटणारी निवडणूक त्यांनी जिंकली. त्यांनी या मतदारसंघावर माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांचे असलेले निर्विवाद वर्चस्व मोडून काढले. भाजपच्या कार्यकाळात ते राज्यमंत्रीसुद्धा होते.

जोगेंद्र कवाडे अनेक वर्षांपासून विधान परिषदेत नागपूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करीत आहेत. खैरलांजी हत्याकांडामुळे सरकारवर नाराज झाल्याने त्यांनी विधान परिषदेचा राजीनामा दिला होता. या दरम्यान त्यांचा उर्वरित काळ वनराईचे गिरीश गांधी यांनी पूर्ण केला. कवाडे यांना त्यानंतर कॉंग्रेसने विधान परिषदेत पाठविले. या दरम्यान प्रकाश गजभिये यांची लॉटरी लागली. त्यांचा सहा वर्षांचा कार्यकाळ जून महिन्यात पूर्ण होत आहे. त्यांना राष्ट्रवादीतर्फे पुन्हा संधी मिळण्याची शक्‍यता आहे.

टेन्शन संपले


चंद्रपूर-यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्थेमधून भाजपने रामदास आंबटकर यांना विधान परिषदेत पाठविले. तेसुद्धा नागपूरचेच रहिवासी आहेत. अनेक वर्षे त्यांनी भाजपात संघटनमंत्री म्हणून काम केले. प्रवीण दटके यांच्या रूपाने एक युवा आणि तडफदार आमदार भाजपने शहराला दिला आहे. विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे जवळपास निश्‍चित झाले आहे. त्यामुळे सर्वच उमेदवारांचे टेंशन संपले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com