
नागपूर ः शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी पतीला पाचव्या पत्नीने खुर्चीला बांधले. त्याला अश्लील व्हिडिओ दाखवून उत्तेजीत केले. संबंधानंतर पत्नीने पतीचा गळा चिरून खून केला. आरोपी पत्नीला गुन्हे शाखेने अटक केली असून तिने हत्याकांडाची कबुली दिली आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रपरिषदेत दिली. लक्ष्मण रामलाल मलिक (६५) असे मृताचे नाव असून स्वाती लक्ष्मण मलिक (२८) असे आरोपी पत्नीचे नाव आहे. आरोपी महिला ही लक्ष्मण यांची पाचवी पत्नी होती. तर लक्ष्मण हा आरोपी महिलेचा तिसरा पती होता.
९ मार्च रोजी रजत संकूल येथील सी क्रमांकाच्या विंगमधील एका कार्यालयात लक्ष्मणचा मृतदेह मिळाला होता. लक्ष्मणचे दोन्ही हात खुर्चीला मागे बांधून मारेकऱ्यांनी गळा चिरला होता. पोलिसांनी दीडशेच्यावर लोकांना चौकशीसाठी बोलविले होते. त्यात लक्ष्मणच्या पाचही बायका आणि त्यांच्या मुलांचा समावेश होता. सोबत ज्यांच्यासोबत लक्ष्मणची वाद होता अशांचाही समावेश होता. परंतु, तपासाच्या दृष्टीने पोलिसांना काहीच माग लागला नव्हता. गुन्हे शाखेचे पीआय संदीपान पवार, प्रशांत लाडे, श्याम कडू, प्रवीण गोरटे, अनुप तायवाडे, संदीप मावलकर आणि टप्पू चुटे यांनी या हत्याकांडाचा छडा लावला.
कॅब ड्रायव्हरमुळे सत्य उघडकीस
पोलिसांनी लक्ष्मणच्या बायकांचे मोबाईल क्रमांक घेतले होते. त्या सर्व मोबाईलचा सीडीआर काढला. त्यात लक्ष्मणची पाचवी पत्नी स्वातीचा देखील समावेश होता. घटनेच्या दिवशी दुपारी अडिच ते रात्री आठ वाजेपर्यंत स्वातीचा मोबाईल बंद होता. घटनेच्या वेळात ती घरीच होती, असा दावा स्वातीने केला. तिच्या क्रमांकावर टॅक्सी ड्रायव्हरचा कॉल होता. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने स्वाती नावाच्या प्रवाशाने गणेशपेठसाठी बूक केल्याचे सांगितले. त्यामुळे स्वातीचे भांडे फुटले.
अशी घडली घटना
आठ मार्चला स्वाती उबेर कारने रजत संकूल येथे गेली. तिने पती लक्ष्मला मोबाईलवरील ब्ल्यू फिल्म दाखविल्या. त्याला उत्तेजित करून त्याच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर तिने पतला खुर्चीवर बसवून त्याचे दोन्ही हात मागे बांधले आणि पुन्हा संबंध केले. त्यानंतर पर्समधील चाकूने त्याच्या गळ्यावर वार करून त्याचा खून केला. त्यानंतर दुपारी ४ च्या सुमारास ऑटो करून ती आपल्या आईच्या घरी गोकूळपेठला निघून गेली.
स्वातीचे अनैतिक संबंध
लक्ष्मणपासून स्वातीला ८ वर्षाचा मुलगा आहे. लक्ष्मणसोबत लग्न झाले तरी ती आपल्याच माहेरी राहत होती. दरम्यान दोन वर्षांपूर्वी तिचे अमित शर्मा नावाच्या एका बसचालकाशी सूत जुळले. त्यानंतर तिने एका मुलाला जन्म दिला. तो मुलगा लक्ष्मण यांचा आहे, असा दावा ती करीत होती. परंतु स्वातीचे अमित शर्मासोबत अनैतिक संबंध असल्याची माहिती लक्ष्मणला होती. त्यामुळे तो बाळाला नाव देण्यास तयार नव्हता. अमितशी असलेले संबंध तोडायला तयार नव्हती. त्यामुळे त्याने तिला त्याचा मुलगा आणि एटीएम कार्ड परत मागितले होते. त्यावरून त्यांच्यात वाद सुरू होता. त्यातूनच ही घटना घडल्याचे तिने पोलिसांना सांगितले. पत्रपरिषदेला अप्पर पोलिस आयुक्त सुनील फुलारी, नवीनचंद्र रेड्डी, पोलिस उपायुक्त गजानन राजमाने, लोहित मतानी आदी उपस्थित होते.
संपादन - अथर्व महांकाळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.