नागपूर जि. प. : भाजप पाच तर कॉंग्रेस तीन तालुक्‍यांत शून्य

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 जानेवारी 2020

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. विधानसभा निवडणुकीत भाजपला पहिला धक्का बसला. आता दुसरा धक्का जिल्हा परिषद निवडणुकीत बसला आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल पाहता भाजपला जिल्हा परिषद निवडणुकीत धक्का लागणार असल्याची चर्चा होती.

नागपूर : जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला चांगलाच धक्‍का बसला आहे. जिल्ह्यातील 13 पैकी पाच तालुक्‍यांत एकही जागा मिळाली नाही, तर कॉंग्रेला तीन तालुक्‍यांत एकही जागा मिळाली नाही.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. विधानसभा निवडणुकीत भाजपला पहिला धक्का बसला. आता दुसरा धक्का जिल्हा परिषद निवडणुकीत बसला आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल पाहता भाजपला जिल्हा परिषद निवडणुकीत धक्का लागणार असल्याची चर्चा होती.

प्रत्यक्ष निकालातून हे स्पष्ट झाले. 58 जागा असलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला 15 जागा मिळाल्या. तर कॉंग्रेसला 30 जागा मिळाल्या. या निवडणुकीत भाजपने सर्व जागा लढवल्या. कॉंग्रेसने 42 व राष्ट्रवादीने कॉंग्रेसने 15 जागांवर उमेदवार दिले. एक जागा शेकापसाठी सोडली होती. निवडणुकीत भाजप आणि सेनेचे सर्वाधिक नुकसान झाले. नरखेड, कळमेश्‍वर, सावनेर, उमरेड, भिवापूर या पाच तालुक्‍यांत भाजपला एकही जागा मिळाली नाही. तर काटोल, हिंगणा, कुही तालुक्‍यांतील कॉंग्रेसला एकही जागा मिळाली नाही. नरखेड, काटोल, नागपूर ग्रामीण, हिंगणा व कुही हे तालुकेवगळता इतर तालुक्‍यांत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वाट्याला एकही जागा आली नाही.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nagpur Dist. W : BJP is zero in five and Congress in three talukas