दारू मिळाली नाही म्हणून अर्ध्या रात्री पडला घराबाहेर... मग

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 एप्रिल 2020

विकास बर्वे हा मूळचा औरंगाबाद शहरातील आहे. लग्न झाल्यानंतर तो नागपुरात सासू-सासऱ्यांकडे राहत होता. तो ऑटोचालक होता आणि त्याला दारूचे  व्यसन होते. सर्व काही सुरळित असताना लॉकडाऊनमुळे त्याला दारू मिळत नव्हती. त्यामुळे तो तणावात होता. याच तणावातून त्याने घरासमोरील मोकळ्या जागेत 29 मार्च रोजी मध्यरात्री 1 वाजताच्या सुमारास अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेतले. ही घटना कळताच परिसरात एकच खळबळ उडाली. लगेच त्याला सासऱ्यांनी उपचाराकरीता मेयो हॉस्पीटल येथे दाखल केले.

नागपूर : युवकाने स्वत:च्या अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेतल्याची घटना अंबाझरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. विकास विठ्ठल बर्वे (30, रा. पांढराबोडी जयनगर) असे मृताचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकास बर्वे हा मूळचा औरंगाबाद शहरातील आहे. लग्न झाल्यानंतर तो नागपुरात सासू-सासऱ्यांकडे राहत होता. तो ऑटोचालक होता आणि त्याला दारूचे  व्यसन होते. सर्व काही सुरळित असताना लॉकडाऊनमुळे त्याला दारू मिळत नव्हती. त्यामुळे तो तणावात होता. याच तणावातून त्याने घरासमोरील मोकळ्या जागेत 29 मार्च रोजी मध्यरात्री 1 वाजताच्या सुमारास अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेतले. ही घटना कळताच परिसरात एकच खळबळ उडाली. लगेच त्याला सासऱ्यांनी उपचाराकरीता मेयो हॉस्पीटल येथे दाखल केले.

एका व्हेंटिलेटरद्वारे मिळणार आठ रुग्णांना श्‍वास, यांना होईल फायदा

उपचारादरम्यान शुक्रवारी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास डॉक्‍टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. विकासच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. याने नेमके कोणत्या कारणासाठी आत्महत्या केली ते अद्याप स्पष्टता होऊ शकली नाही. पोलिसांनी तुर्तास आकस्मात मृत्युची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. "गेल्या काही दिवसांपासून दारू प्यायला मिळत नव्हती. त्यामुळे मी तणावात होतो,' असे त्याने पोलिसांना दिलेल्या बयाणात म्हटले आहे. त्यावरून दारू न मिळाल्याने युवकाने आत्महत्या केल्याचे बोलल्या जाते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur married man commited suicide at midnight