नागपुरातील आमदार निवास होणार कोविड सेंटर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जून 2020

नागपूर महानगरात कोरोना वेगाने पसरत असून शासकीच रुग्णालये अपूरी पडत आहे. तसेच सुविधाही उपलब्ध होणे जिकरीचे होत आहे. त्यामुळेच आमदार निवासातील विलगीकरण केंद्राला "कोविड सेंटर'मध्ये रूपांतर करण्यात येत आहे. यामुळे जास्तीत जास्त रुग्णांची सोय करणे शक्य होणार आहे.

नागपूर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे शहरातील नागपूर महापालिकेची दवाखाने विकसित करण्यासोबतच महापालिकेचा पाचपावली दवाखाना, सदर दवाखाना, केटी नगर दवाखाना, इंदिरा गांधी रुग्णालय कोविड सेंटर तयार करण्यासंदर्भात हालचाली होत्या. परंतु, झाले वेगळेच. जसे मेडिकलच्या ट्रॉमा सेंटरला बदलून कोविड हॉस्पिटल तयार करण्यात आले.त्याच धर्तीवर आता आमदार निवास विलगीकरण केंद्राला "कोविड सेंटर'मध्ये रूपांतर करण्यात येत आहे.

शहरात सुमारे पंधरांपेक्षा अधिक विलगीकरण केंद्रे तयार करण्यात आली आहेत. आमदार निवास विलगीकरणाला कोविड सेंटर तयार करण्याचे संकेत असल्याने येथील प्रवेश बंद करण्यात आले आहेत. लक्षणे नसलेल्या कोरोनाबाधित रुग्णांना येथे भरती उपचारासाठी तसेच डॉक्‍टरांच्या निरीक्षणात ठेवण्यात येणार आहे. मात्र, पालिकेकडे डॉक्‍टरांची संख्या तोकडी आहे. मनपाकडे किती फिजिशियन आहेत हे सांगता येत नाही. असो साथीच्या आजारावर नियंत्रणाची जबाबदारी पालिकेची आहे. परंतु, पालिकेची आरोग्य यंत्रणा सक्षम नाही. ही सक्षम बनविण्यासाठी 1 कोटी 90 लाख एवढ्या निधीची आवश्‍यकता होती. या निधीतून पालिकेच्या पाचपावली दवाखाना, सदर दवाखाना, केटी नगर दवाखाना, इंदिरा गांधी रुग्णालय विकासाचा आराखडा तयार केला.

वाचा- तुकाराम मुंढेंच्या संयमाने अनेकांना आश्‍चर्य

कोविड-19च्या पार्श्‍वभूमीवर पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी हा निधी पालिकेस देण्यास मंजुरी प्रदान केली आहे. या आर्थिक मंजुरीमुळे, नागपुरातील नागरिकांना पालिकेच्या रुग्णालयात अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होण्यास मोठा हातभार लागणार आहे. मात्र, मध्येच आमदार निवास विलगीकरण केंद्राला कोविड सेंटर म्हणून विकसित करण्यात येत असल्यामुळेच येथील प्रवेश बंद करण्यात आले. सध्या आमदार निवास विलगीकरण केंद्रात आता शंभरापेक्षा अधिक व्यक्ती आहेत.

मेयो-मेडिकलवर येणार भार

या कोविड सेंटरमध्येही मेडिकल, मेयो, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय तसेच आरोग्य विभागातील डॉक्‍टर, परिचारिकांसह इतर कर्मचाऱ्यांवरच भार येणार आहे. येथे रुग्णांच्या रक्तातील ऑक्‍सिजनचे प्रमाणासह इतर नाममात्र तपासणी होतील. ती नित्याने केली जाईल. काही परिणाम आढळल्यास तातडीने मेडिकल, मेयो किंवा एम्समध्ये दाखल करण्यात येणार आहे. आमदार निवासातील कोविड केअर सेंटरमध्ये सुमारे 350 खाटांची सोय केली जाणार आहे. प्रत्येक खोलीत दोघांना ठेवले जाणार आहे. या रुग्णांची येथे चहापासून जेवणापर्यंतची सोय केली जाईल.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nagpur MLA Hostel will be turne into Covid Center