या खेळाडूंनी शिक्षणाच्या मैदानातही मारली बाजी 

file photo
file photo

नागपूर : वर्षभर मैदानावर "प्रॅक्‍टिस' करून परिक्षेतही गरुडझेप घेणे, याला निश्‍चितच टॅलेंट लागते. दहावीतील अनेक खेळाडूंनी घवघवीत यश मिळवून खेळासोबतच शिक्षणाच्या मैदानातही "टॉप' असल्याचे दाखवून दिले. सोमलवार, मुंडले, पंडित बच्छराज, अमित हायस्कूलसह विविध शाळांमधील खेळाडू विद्‌यार्थ्यांनी परिक्षेत बाजी मारून आपले अष्टपैलूत्व सिद्‌ध केले. 


सोमलवार निकालस शाखेचा विद्‌यार्थी व टेबलटेनिसपटू वरेण्य पवनीकरने 99.8 टक्‍के, बुद्धिबळपटू रिषिकेश चव्हाणने 99, बास्केटबॉलपटू स्नेहल चौधरीने 98, कबड्‌डीपटू साकेत कलोडेने 97.6, बॅडमिंटनपटू अजिंक्‍य मोहितेने 97.4, बास्केटबॉवपटू शर्वरी येनप्रेड्‌डीवारने 97.2, टेबलटेनिसपटू अर्णव पिंपळेने 95.6, बास्केटबॉलपटू स्नेहा सहस्त्रबुद्‌धे व सम्राट धमगायेने 95, व्हॉलीबॉलपटू तन्मय ढोबळेने 94.8, बुद्धिबळपटू पार्थ दिवाळेने 94.6, क्रिकेटपटू स्वराज गोडबोलेने 94.2, फुटबॉलपटू मिहीर पांडे व अथर्व जोशीने 94.2, बुद्धिबळपटू सुजल अग्रवालने 93.6, कबड्‌डीपटू यश देशपांडेने 93.6, बास्केटबॉलपटू चैतन्य पर्वतेने 93.6, क्रिकेटपटू शर्वरी भुश्रूंडीने 93.4, जलतरणपटू राधा घोटकरने 93, कबड्‌डीपटू रक्षक हिंगवेने 92.8, क्रिकेटपटू शशांक श्रीवास्तवने 92.4, चिन्मय टेकाडेने 91, बॅडमिंटनपटू कुणाल गेडामने 90, बास्केटबॉलपटू दर्शन बुटलेने 91.6, बुद्धिबळपटू आर्श हडपने 91, प्रथमेश लोहितने 90.6, बास्केटबॉलपटू वेदश्री जगदाळेने 90.6, क्रिकेटपटू स्नेहल त्रिपाठीने 90.6 आणि अजिंक्‍य सहस्त्रबुद्‌धेने 89 टक्‍के गुण मिळविले. 


अमित हायस्कूलची कबड्‌डीपटू सलोनी मोटघरेने 98, योगासनपटू सुहानी गिरीपुंजेने 92, रचना आंबुलकर व पियुषी देवगिरकरने 90, कबड्‌डीपटू सिद्‌धी कडूकरने 91 व वैष्णवी रामगिरकरने 86 टक्‍के गुणांची कमाई केली. याशिवाय मानेवाडा येथील शाहूज गार्डनच्या देवांग काळे व सोहम वेगिनवारने प्रत्येकी 94, आदित्य घिचरेने 92.60, सौरभ जांगीडने 90.40, आर्यन पारधीने 89, तेजस मोहोडने 78, इशिका इंतुरकरने 91, संस्कृती बानाईतने 86, सोनम प्रसादने 82, बीकेसीपी स्कूलची धावपटू सानिका मंगरने 92, रुद्रांश मरघडेने 84, गायत्री विद्‌यामंदिरच्या आर्यन कांबळेने 80.8, नवयुग विद्‌यालयाच्या सुधानवा ढेंगेने 80.49, न्यू इंग्लिश कॉंग्रेसनगरच्या अनुराग बावनकुळेने 79, व्हॉलीबॉलपटू वैभव शेंडेने 77.20, तसेच पंडित बच्छराज व्यास विद्‌यालयाची सॉफ्टबॉलपटू महक बांतेने 89, वेदांत पाटणकरने 85.40, आदित्य बुरडेने 81.80, ऍथलिट हर्षल छेत्रीने 87, बॉलबॅडमिंटनपटू जयंत ठाकरेने 83, व्हॉलीबॉलपटू आटेने 81, श्रृती बोधनकरने 78.60, सॉफ्टबॉलपटू प्रशांत मगरने 76 व ऍथलिट यश मोरेने 74.20 टक्‍के गुण मिळविले. याशिवाय ऍथलिट संवेदना मतेने 92 टक्‍के, वैष्णवी पुरीने 85.20 टक्‍के गुणांची कमाई केली. 

मुंडले स्कूलचीही गरुडझेप 


मुंडले इंग्लिश मीडियम स्कूलची ऍथलिट निहारिका पटेलने 96.40, खोखोपटू संस्कृती पौनिकरने 95.20, राधिका पाटीलने 94.80, जलतरणपटू श्रिया दाभाडेने 93.20, खोखोपटू साकार भागवतने 96.40, देवांश तेलंगने 92.60, अथर्व हरदासने 91.80, व्हॉलीबॉलपटू वेदांत मानकरने 89.80, ऍथलिट सुमेध काळेने 88.80, शरद सकदेवने 85.60, आयुष कांबळेने 84.80, बॉलबॅडमिंटनपटू जान्हवी टिकेकरने 88.20 टक्‍के व आर्यन मानकरने 83.80 टक्‍के गुण मिळविले. याशिवाय आर. एस. मुंडले स्कूलची ऍथलिट शिखा दुबेने 92 टक्‍के, प्रभव पुराणिकने 88.40 टक्‍के, खोखोपटू अभिनव गाडगीळने 90.80 टक्‍के गुण प्राप्त केले.  

 

संपादन : नरेश शेळके 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com