
नागपूर : कोरोना विषाणूमुळे जगभरातील स्पर्धा प्रभावीत झाल्या. त्याचा फटका खेळाडूंना बसला. ऑलिंपिक एक वर्ष पुढे ढकलावे लागले. त्यास राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे खेळाडूही अपवाद ठरू शकले नाही. त्याचा फटका या खेळाडूंना बसणार आहे.
लॉकडाउनमुळे काही अखिल भारतीय आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धा स्थगित झाल्यामुळे यावर्षी नागपूर विद्यापीठाचे खेळाडू विद्यार्थी सवलतीच्या क्रीडा गुणांपासून वंचित राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शरद सूर्यवंशी यांनी नुकतीच नागपूर, वर्धा भंडारा व गोंदिया जिल्ह्यांतील शारीरिक शिक्षण शिक्षकांची ऑनलाइन बैठक घेतली. यात विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या दृष्टिकोनातून क्रीडा गुण आणि ब्लेझर या दोन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या व प्रतिष्ठेच्या असल्याचे सांगण्यात आले. स्पर्धा रद्द झाल्यास खेळाडूंचे नुकसान होऊ शकते.
महिलांची अखिल भारतीय आंतरविद्यापीठ वुशू स्पर्धा 26 ते 30 मार्चदरम्यान फगवाडा येथे व पुरुषांची स्पर्धा 29 ते 31 मार्चदरम्यान अमृतसर येथे खेळली जाणार होती. याशिवाय बेसबॉल 27 ते 30 मार्चदरम्यान गुवाहाटी येथे, मिनी गोल्फ स्पर्धा 4 ते 8 एप्रिलदरम्यान जयपूर येथे तसेच जिम्नॅस्टिक्स स्पर्धा 14 ते 19 एप्रिल या कालावधीत अमृतसर येथे होणार होती. परंतु, लॉकडाउननंतर या सर्व स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या. डॉ. सूर्यवंशी म्हणाले, खेळाडूंनी स्पर्धेची संपूर्ण तयारी केली होती. रेल्वे रिझर्वेशनही करण्यात आले होते. परंतु, अचानक कोरोनामुळे स्पर्धा स्थगित झाल्या. यासंदर्भात अंतिम निर्णय एआययूला घ्यायचा आहे.
आणखी वाचा - लॉकडाउनमध्ये पंधरा हजार झाडांच्या संवर्धनाचा वसा
अखिल भारतीय स्पर्धेत पदक पटकाविणाऱ्या खेळाडूंना 25 गुण, पश्चिम विभाग आंतरविद्यापीठ स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंना 15 गुण आणि आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत खेळणाऱ्या खेळाडूंना 10 गुण देण्यात येते. लॉकडाउनमुळे आतापर्यंत विद्यापीठाच्या महिला क्रिकेट, स्केटिंग आणि पुरुष व महिलांच्या रग्बी स्पर्धाही होऊ शकलेल्या नाही.
लॉकडाउनमुळे आता अखिल भारतीय स्पर्धा होईल की नाही हे सांगता येत नाही. दुर्दैवाने ही स्पर्धा न झाल्यास आम्हा खेळाडूंचे खूप नुकसान होणार आहे. कारण स्पर्धेसाठी आम्ही वर्षभर मेहनत केलेली आहे. स्थिती नॉर्मल होईल, अशी आशा करते.
-मृण्मयी वालदे, आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्ट
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.