नागपूर विद्यापीठ प्रशासन म्हणतेय, ऑनलाईन परीक्षेत राज्यात आम्हीच अव्वल

मंगेश गोमासे
Friday, 30 October 2020

सर्वोच्च न्यायालयाने अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचा निर्णय देताच करोना काळात अंतिम वर्षाची परीक्षा कशी घेता येईल यासाठी राज्य सरकारच्या वतीने दिशानिर्देश देणारी समिती तयार करण्यात आली. यामध्ये समितीमध्ये मुंबई आणि पुणे विद्यापीठाने ऑनलाईन परीक्षा घेण्याची मागणी केली होती. इतकेच नाही तर गरज पडल्यास आम्ही अन्य विद्यापीठांनाही ऑनलाईन परीक्षेसाठी मदत करू असे आवाहन केले होते.

नागपूर : बहुतांश विद्यापीठांच्या परीक्षा तांत्रिक कारणामुळे सुरुच होऊ शकल्या नसताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने अनेक तांत्रिक अडचणी सोडवत विद्यापीठाशी सलंग्नित सर्व महाविद्यालये आणि विद्यापीठ विभागाच्या सर्व परीक्षा या वेळेत आणि सुरळीत पार पडल्याचा दावा केला आहे. आतापर्यंत ६५ हजारांहून विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचा निर्णय देताच करोना काळात अंतिम वर्षाची परीक्षा कशी घेता येईल यासाठी राज्य सरकारच्या वतीने दिशानिर्देश देणारी समिती तयार करण्यात आली. यामध्ये समितीमध्ये मुंबई आणि पुणे विद्यापीठाने ऑनलाईन परीक्षा घेण्याची मागणी केली होती. इतकेच नाही तर गरज पडल्यास आम्ही अन्य विद्यापीठांनाही ऑनलाईन परीक्षेसाठी मदत करू असे आवाहन केले होते.

ग्रामीण भागात कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण तब्बल ९० टक्क्यांच्या वर; कोविड योद्धयांच्या परिश्रमाचं फळ

मात्र, या दोन्ही विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षा स्वत:च तांत्रिक अडचणीत सापडल्याने परीक्षांचा फज्जा झाला होता. मुंबई विद्यापीठाच्या नियमित १ लाख ५८ हजार विद्यार्थ्यांची परीक्षा पूर्ण झाली असली तरी त्यात अनेक गोंधळ निर्माण झाले होते. पुणे विद्यापीठात तांत्रिक गोंधळामुळे आतापर्यंत एकूण पाच वेळा परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. यामुळे येथील अनेक विद्याथ्र्यांना आता ऑफलाईन परीक्षा द्यावी लागणार आहे.

या तुलनेत नागपूर विद्यापीठाच्या परीक्षांमध्ये अनेक तांत्रिक अडचणी आल्या असल्या तरी त्या सर्व दूर करीत नागपूर विद्यापीठाने ९५ टक्के विद्यार्थ्यांची परीक्षा सुरळीत पार पडल्याचा दावा विद्यापीठाने केला आहे. विशेष म्हणजे ८ ऑक्टोबरपासून सुरू झालेली परीक्षा एकदाही रद्द किंवा पुढे न ढकलता परीक्षा नियोजित वेळेत घेण्यात आल्याचे विद्यापीठाने सांगितले आहे. याशिवाय जे विद्यार्थी ऑनलाईन परीक्षेपाला मुकले त्यांची परीक्षाही त्वरित घेऊन वेळेत निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचेही कुलगुरू डॉ. चौधरी यांनी सांगितले.
 

स्वतःची प्रश्न बॅंक तयार
पुणे, मुंबई विद्यापीठामध्ये मोठ्या प्रमाणात सुविधा असल्याने सुरुवातीला त्यांनीच विद्यापीठाला मदतीचे आश्वासन दिले. विद्यापीठाने स्वतःची प्रश्न बॅंक तयार केली. तसेच वेळोवेळी येणाऱ्या सर्व समस्या सोडवून परीक्षा सुरळीत पार पाडल्या आहेत. त्यामुळे राज्यात ऑनलाईन परीक्षेत नागपूर विद्यापीठ सर्वात यशस्वी ठरल्या आहेत.
डॉ. सुभाष चौधरी, कुलगुरू, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nagpur University tops state in online exams claims university