नागपूर जिल्हा परिषद : 21 व्या अध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 जानेवारी 2020

बळीराम दखणे यांच्याकडे काही काळ अध्यक्षपदाची धुरा होती. प्रभाकर किनखेडे, दे. ज. कुंभलकर, रणजित देशमुख, विठ्ठल टालाटुले, पांडुरंग मते, सदानंद निमकर, अनिल देशमुख, अशोक धोटे, रत्नमाला पाटील, बंडोपंत उमरकर, पुरुषोत्तम डाखोळे, सुमन बावनकुळे, सुनीता गावंडे, श्‍यामदेव राऊत, रमेश मानकर, सुरेश भोयर, संध्या गोतमारे, निशा सावरकर हे अध्यक्ष राहिले.

नागपूर : जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून कॉंग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यामुळे कॉंग्रेस पक्षाचाच सदस्य अध्यक्ष होणार असल्याचे स्पष्ट आहे. जिल्हा परिषदेत आतापर्यंत 20 अध्यक्ष झाले असून, 21 व्या अध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडते, याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. आतापर्यंत 15 उपाध्यक्ष झाले असून हे पद राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे येणार असल्याची चर्चा आहे.

हे वाचाच - खिल्ला-या बैलांची गाडी गेली थेट न्यायालयात

नागपूर जिल्हा परिषद 1962 ला अस्तित्वात आली. या निवडणुकीत छाप सोडणारे मंत्री सुनील केदार यांचे वडील छत्रपाल केदार यांनी जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष बनण्याचा मान मिळविला. सर्वाधिक काळ ते अध्यक्ष होते. बळीराम दखणे यांच्याकडे काही काळ अध्यक्षपदाची धुरा होती. प्रभाकर किनखेडे, दे. ज. कुंभलकर, रणजित देशमुख, विठ्ठल टालाटुले, पांडुरंग मते, सदानंद निमकर, अनिल देशमुख, अशोक धोटे, रत्नमाला पाटील, बंडोपंत उमरकर, पुरुषोत्तम डाखोळे, सुमन बावनकुळे, सुनीता गावंडे, श्‍यामदेव राऊत, रमेश मानकर, सुरेश भोयर, संध्या गोतमारे, निशा सावरकर हे अध्यक्ष राहिले. उपाध्यक्ष होण्याचा पहिला मान न. दा दखणे यांना मिळाला होता. त्यानंतर रा. मेश्राम, दे. कुंभलकर, सा. समर्थ, दे. रडके, स. निमकर, बंडोपंत उमरकर, चरणसिंग ठाकूर, रमेश मानकर, शेषराव रहाटे, ज्ञानेश्‍वर साठवणे, तापेश्‍वर वैद्य, नितीन राठी, चंद्रशेखर चिखले, शरद डोणेकर हे उपाध्यक्ष राहिलेत. यंदा अध्यक्षपद अनुसूचित जाती महिलासाठी राखीव आहे.

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nagpur Zilla Parishad: In whose throat is the 21st president's post?