नागपूरच्या परेशने केली सागरी मोहीम फत्ते; ४.२९ तासांत एलिफंटा ते गेट वे ऑफ इंडिया प्रवास

Nagpurs Paresh wins naval expedition Travel from Elephanta to Gateway of India in 4.29 hours
Nagpurs Paresh wins naval expedition Travel from Elephanta to Gateway of India in 4.29 hours

नागपूर : रेल्वे सुरक्षा दलातील जवान विजय पाटील यांचा मुलगा परेशने वयाच्या केवळ १४ व्या वर्षी एलिफंटा ते गेट वे ऑफ इंडिया ही १८ किमी अंतराची सागरी मोहीम केवळ ४ तास २९ मिनिटांत फत्ते केली. या अनोख्या कामगिरीद्वारे त्याने कोरोना विरोधातील मोहीम यशस्वी हाताळल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सेल्यूट केले. अथांग सागरात निष्नातपणे पोहणाऱ्या मुलाला बघून आई-वडिलांचे डोळे पाणावले. पण, मुलाने यश गाठताच त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रृ तरळले.

परेश इयत्ता ९ वीचा विद्यार्थी आहे. वडील विजय पाटील यांनी आरपीएफ दलात अनेक धाडसी कारवाया केल्या. कोराना काळात डॉक्टर, परिचारिका, पोलिस, स्वच्छता दूत आदी कोरोना योध्दांचा सन्मान करण्यात आला. मात्र, राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना कोणीही सॅल्यूट केला नाही. परेशने एलिफंटा ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत समुद्रात पोहून आगळी वेगळी मानवंदना देण्याचा संकल्प केला.

रविवारी सकाळी ५ वाजता त्याने पाण्यात उडी घेतली. ठरल्या प्रमाणे १४ किमीचा हा प्रवास होता. मात्र, नेव्हीचे काही जहाज येत असल्याने ऐनवेळी मार्गात बदल करण्यात आला. एलिफंटा ते व्हाईट हाउस आणि व्हॉईट हाउस ते गेट वे ऑफ इंडिया असा १८ किमीचा प्रवास त्याने केवळ ४.२९ तासांत पूर्ण केला.

प्रमाणपत्र देऊन सत्कार

या धाडसी आणि साहसी कार्याने मध्य रेल्वे झोनचे आरपीएफ आयजी अजय सदानी यांनी त्याचे कौतुक करून सत्कार केला. याप्रसंगी नवी मुंबई मेट्रोचे प्रभारी नामदेव रबडे, आरपीएफ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी विविध संस्था संघटनांतर्फे परेशचे कौतुक करण्यात आले. प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com