नाना पटोलेंना ऊर्जा मंत्रीपद तर नितीन राऊतांकडे विधानसभेचे अध्यक्षपद? राजकीय वर्तुळात रंगली चर्चा  

nana patole and nitin raut
nana patole and nitin raut

नागपूर ः विधानसभेचे माजी अध्यक्ष नाना पटोले यांची महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदी नियुक्ती झाल्यानंतर आता नवे विधानसभा अध्यक्ष कोण होणार यावर राजकीय विश्वात चांगलीच चर्चा रंगली होती. मात्र आता ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची विधानसभा अध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसंच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना ऊर्जा मंत्रीपद देण्यात येणार आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. 

माझीच मंत्रिमंडळात जाण्याची इच्छा नाही

"पक्षश्रेष्ठींनी संघटनेचे काम माझ्यावर सोपविले आहे आणि ते मी पूर्ण प्रामाणिकपणा आणि मेहनतीने करीत आहो. सध्या राज्यात जी स्थिती आहे, ती पाहता सध्या माझीच मंत्रिमंडळात जाण्याची इच्छा नाही. सध्या संघटन मजबूत करायचे आहे. पण श्रेष्ठी जो आदेश देतील, त्याचे प्रश्‍न न करता पालन करायचे आहे, असे नानांनी सांगितले. हे बोलत असताना मंत्रिपदाची त्याची सुप्त इच्छा लपून राहिली नाही. मात्र त्यांनी त्याला ‘पक्षश्रेष्ठी जो आदेश देतील", असे उत्तर दिले. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार नाना पटोलेंचे ऊर्जामंत्रीपद जवळजवळ पक्के असल्याचे मानले जात आहे. 

मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल होण्याची चिन्हे 

राज्याच्या मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल होण्याची शक्यता आहे. ऊर्जा खाते नानांना देण्यासाठी दिल्लीत बैठक असल्याचेही सूत्रांनी सांगितले. लवकरच हा निर्णय कॉंग्रेस हायकमांड घेतील, असेही सूत्र सांगतात. नानांना ऊर्जामंत्री बनवले तर मग डॉ. नितीन राऊत यांचे काय, याचे उत्तर शोधले जात आहे. दलितांचे प्रश्‍न प्राधान्याने सोडवायचे असतील तर त्यासाठी संवैधानिक पद असणे केव्हाही उत्तम. त्यामुळे डॉ. नितीन राऊत यांना विधानसभेच्या अध्यक्षपदी विराजमान केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे. यासंदर्भात ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र होऊ शकला नाही.

प्रदेशाध्यक्षाला कार्यकर्त्यांचे संघटन करताना राज्यभर फिरावे लागते. मेळावे, बैठका घ्याव्या लागतात. यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्‍यकता असते. त्यामुळे प्रदेशाध्यक्षाकडे मंत्रिपद त्या तोडीचे असावे असं काही कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे आता नाना पाटोले यांना ऊर्जा मंत्रीपद मिळणार ही अशी माहिती मिळतेय.  

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com