‘राज्यात महाविकासआघाडीचे सरकार असले तरी निवडणुका काँग्रेस स्वबळावरच लढेल’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nana Patole said that Congress will fight on its own Nagpur political news

सत्ता गेल्यामुळे भाजपचे नेत चांगलेच अस्वस्थ आहे. पुन्हा सत्तेवर येण्याची धडपड त्यांची सुरू आहे. राज्याला बदनाम करण्याचेही काम केले जात आहे. सुशांतसिंग राजपूत, सचिन वाझे, परमबीर सिंग प्रकरणामुळे राज्याची बदनामी होत आहे.

‘राज्यात महाविकासआघाडीचे सरकार असले तरी निवडणुका काँग्रेस स्वबळावरच लढेल’

नागपूर : राज्यात महाविकासआघाडीचे सरकार असले तरी विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावरच लढेल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शनिवारी पुन्हा स्पष्ट केले. पटोले नागपूरला आले असता पत्रकारांशी संवाद साधला. फडणवीस यांच्या खोट्या आरोपांमुळे सरकार पडणार नसल्याचा दावाही नाना पटोले यांनी केला.

राज्यातील घडामोडींवर भाष्य करताना नाना पटोले यांनी रश्‍मी शुक्लाच नव्हे तर कुठल्याही अधिकाऱ्याने राजकीय पक्षाला समर्पित होऊ काम करणे लोकशाहीला घातक असल्याचे सांगितले. रश्मी शुक्ला यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. जे समोर येईल त्यानुसार कारवाई केली जाईल. फडणवीस यांच्या खोट्या आरोपांमुळे सरकार पडणार नसल्याचा दावाही नाना पटोले यांनी केला.

सत्ता गेल्यामुळे भाजपचे नेत चांगलेच अस्वस्थ आहे. पुन्हा सत्तेवर येण्याची धडपड त्यांची सुरू आहे. राज्याला बदनाम करण्याचेही काम केले जात आहे. सुशांतसिंग राजपूत, सचिन वाझे, परमबीर सिंग प्रकरणामुळे राज्याची बदनामी होत आहे. यानंतरही भाजपचा खोटे बोलण्याचा उद्योग सुरूच आहे. त्यामुळे काही साध्य होईल, असे दिसत नाही, असेही नाना पटोले म्हणाले.

घनदाट जंगलात अजूनही उभा आहे अष्टकोनी वाडा, २०० एकर जमीनदारी असलेला परिवार एका रात्रीत झाला होता गरीब

लोया प्रकरणाची चौकशी

भाजपच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात झालेले घोटाळे आणि अनेक प्रकरणे आता पुढे येणार आहेत. यात जस्टिस लोया प्रकरणाचाही समावेश आहे. आम्ही उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमार्फत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यामुळेच भाजपचे नेते बेछूट आरोप करून दुसरीकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करीत आहेत.

टॅग्स :Congress