एक लक्षात ठेवा! राष्ट्रवादी आता राज्यात काँग्रेसपेक्षा मोठा पक्ष; शहराध्यक्ष अनिल अहीरकर यांनी दिला इशारा

राजेश चरपे
Tuesday, 27 October 2020

महापालिकेच्या निवडणुकीत शेवटपर्यंत ताटकळत ठेऊन जेथे आमच्या उमेदवाराचा फारसा जोर नाही अशा जागा सोडल्या जातात. आमचा एकच नगरसेवक आहे. मात्र, काँग्रेसच्या तुलनेत आमच्या वाट्याला निम्म्यासुद्धा जागा नव्हत्या. शंभर जागा लढवून काँग्रेसचे फक्त १८ नगरसेवक निवडून आले आहेत. याकडेही अहीरकर यांनी लक्ष वेधले.

नागपूर : महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला गृहित धरून दाहा-बारा जागा दिले जात असतील तर ते आता खपवून घेतले जाणार नाही, आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढण्यास तयार आहोत, असा इशारा राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अनिल अहीरकर यांनी दिला.

राष्ट्रवादी आता राज्यात काँग्रेसपेक्षा मोठा पक्ष झाला आहे. आमच्या आमदारांची आणि मंत्र्यांची संख्याही जास्त आहे. शहरात आमची काहीच ताकद नाही, असे वारंवार दर्शवून यापूर्वी काँग्रेसने नेहमची आम्हाला दुय्यम स्थान दिले. विधानसभेत एकही उमेदवार दिला नाही.

महत्त्वाची बातमी - ग्रामपंचायत निवडणुकांचे पडघम वाजण्याचे संकेत, जिल्हा परिषदेच्या दोन सर्कलमध्येही पोटनिवडणूक 

महापालिकेच्या निवडणुकीत शेवटपर्यंत ताटकळत ठेऊन जेथे आमच्या उमेदवाराचा फारसा जोर नाही अशा जागा सोडल्या जातात. आमचा एकच नगरसेवक आहे. मात्र, काँग्रेसच्या तुलनेत आमच्या वाट्याला निम्म्यासुद्धा जागा नव्हत्या. शंभर जागा लढवून काँग्रेसचे फक्त १८ नगरसेवक निवडून आले आहेत. याकडेही अहीरकर यांनी लक्ष वेधले.

दोन्ही काँग्रेस एकत्रित येणे गरजेचे

कोव्हिड इस्पितळासंर्भात निवेदन दिल्यानंतर अहीरकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. महापालिकेत भाजपला पराभूत करायचे असेल तर दोन्ही काँग्रेस एकत्रित येणे गरजेचे आहे. मात्र, राष्ट्रवादीला दुय्यम समजून जागा वाटप केल्यास आम्ही ते सहन करणार नाही, असेही अहीरकर यांनी सांगितले.

संपादन - नीलेश डाखोरे

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP's city president Anil Ahirkar gave a warning