विद्यापीठाचे ऍकेडमिक कॅलेंडर संकेतस्थळावर, ही महाविद्यालये सुरू होणार ऑगस्टमध्ये...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जून 2020

 हिवाळी सुट्या 25 डिसेंबर 2020 ते 15 जानेवारी 2021 दरम्यान देण्यात येईल. याशिवाय उन्हाळ्यातही 26 मे ते 25 जून यादरम्यान म्हणजे एकाच महिन्याच्या सुट्या देण्यात येतील. विशेष म्हणजे प्राध्यापकांना यादरम्यान दोन ते अडीच महिन्याच्या सुट्या असतात.

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे 2020-21 या शैक्षणिक वर्षाची सुरुवात एक ऑगस्टपासून करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भातील ऍकेडमीक कॅलेंडर विद्यापीठाने संकेतस्थळावर प्रकाशित केले आहे. कॅलेंडरनुसार डिसेंबर महिन्यात दीक्षान्त समारंभाचे आयोजन करण्यात येणार आहे.
विद्यापीठाद्वारे दरवर्षी ऍकेडमीक कॅलेंडर प्रकाशित करण्यात येते. दरवर्षी ऑगस्टपासून प्रथम सत्रास सुरुवात होत आहे.

 पहिले, तिसरे, पाचवे आणि सातव्या सेमिस्टरच्या अभ्यासक्रमास सुरुवात होते. साधारणत: हे सत्र 24 डिसेंबरपर्यंत पूर्ण होते. मात्र, यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने ऍकेडमीक कॅलेंडरवर परिणाम होईल असे चित्र निर्माण झाले होते. मात्र, विद्यापीठाकडून त्यात आंशिक बदल करण्यात आलेला असल्याचे दिसते. कॅलेंडरनुसार 1 ऑगस्टला पहिले सत्र (1,3,5,7) सुरू होईल. 24 डिसेंबरला हे सत्र संपणार असून दुसरे सत्र (2,4,6,8) सुरू होईल. हे सत्र 25 मे 2021 पर्यंत चालेल. मात्र, कोरोनामुळे मार्च महिन्यापासून महाविद्यालये बंद झाल्याने त्यात बऱ्याच सुट्या होऊन शैक्षणिक नुकसान झाल्याचे दिसून आले. त्यामुळे दरवर्षी महाविद्यालयांना दिवाळीच्या महिन्याभराचा सुट्या देण्याऐवजी यावर्षी 10 ते 16 नोंव्हेंबरदरम्यान केवळ 7 दिवसाच्या दिवाळीच्या सुट्या देण्यात येणार आहेत

वाचा- अर्थसंकल्पाला मंजुरी; पण निधी खर्च करता येईना, काय असावी अडचण...

 हिवाळी सुट्या 25 डिसेंबर 2020 ते 15 जानेवारी 2021 दरम्यान देण्यात येईल. याशिवाय उन्हाळ्यातही 26 मे ते 25 जून यादरम्यान म्हणजे एकाच महिन्याच्या सुट्या देण्यात येतील. विशेष म्हणजे प्राध्यापकांना यादरम्यान दोन ते अडीच महिन्याच्या सुट्या असतात.

15 सप्टेंबरपर्यत प्रवेश प्रक्रिया
विद्यापीठाची प्रवेश प्रक्रिया 1 ऑगस्टपासून सुरू होणार असून ती विविध विभाग आणि संलग्नित महाविद्यालयांसाठी 15 सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. कुलगुरूंच्या विशेष परवानगीनुसार 30 सप्टेंबरपर्यंत ती वाढविता येणार आहे. प्रवेश प्रक्रिया संपताच, महाविद्यालयांना 15 दिवसात विद्यार्थ्यांचे एनरॉलमेंट करुन घ्यावे लागणार आहे.

20 नोव्हेंबरपासून परीक्षा

नव्या शैक्षणिक सत्रात हिवाळी परीक्षांच्या तारखा विद्यापीठाने घोषित केल्या असून 2,4,6,8 सेमिस्टरमधील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची परीक्षा 20 नोव्हेंबर तर 1,3,5,7 सेमिस्टरमधील नियमित विद्यार्थ्यांची परीक्षा 17 डिसेंबरपासून सुरू होतील. उन्हाळ्यात 1,3,5,7 सेमिस्टरमधील विद्यार्थ्यांची परीक्षा 22 मार्च से तर 2,4,6,8 सेमिस्टमधील नियमित विद्यार्थ्यांची परीक्षा 22 मे सुरू होईल.

डिसेंबरमध्ये दीक्षान्त समारंभ
विद्यापीठाच्या ऍकेडमीक कॅलेंडरनुसार दीक्षान्त समारंभ डिसेंबर महिन्यातच घेण्याची शक्‍यता वर्तविण्यात आलेली आहे. यामध्ये 2019 या शैक्षणिज वर्षामधील विद्यापीठाच्या हिवाळी आणि उन्हाळ्यातील 2020 या सत्रातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: New Academic Calender of Nagpur University on Website