प्रयोगशील शिक्षक राबविताहेत विद्यार्थ्यांसाठी अनोखा उपक्रम! जाणून घ्या नेमके काय

Online-Teaching_
Online-Teaching_
Updated on

नागपूर :  कोरोनामुळे शिक्षण प्रक्रिया अडचणीत आली आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग अद्यापही कमी झालेला नसल्याने पूर्ण क्षमतेने शाळा सुरु करण्यात अडचणी येत आहेत. यामुळे मुले शाळेपासून दूर होत आहेत. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, तसेच शाळा बंद असल्या तरी शिक्षण सुरू राहावे, यासाठी प्रयोगशील शिक्षक सचिन चव्हाण यांनी 'घरीदारी शाळा' हा अनोखा उपक्रम रामटेक तालुक्यातील जिल्हा परिषद डिजिटल उच्च प्राथमिक शाळा हिवराहिवरी येथील शाळेतील विद्यार्थ्यांसाठी सुरू केला आहे.

टाळेबंदी लागल्यावर शिक्षक सचिन चव्हाण यांची स्वस्त धान्य दुकान, कोरोना सर्वेक्षण, रेशन कार्ड नसलेल्या कुटुंबाचे सर्वेक्षण, कोरोना निरंतर सर्वेक्षणसाठी गावात ड्युटी लागली. कोरोना संकटात मागील चार महिन्यापासून 'कोरोना योद्धा' म्हणून गावात काम करीत असताना त्यांची पालकांशी भेट व्हायची. एकदा त्यांनी पालक व विद्यार्थ्यांशी घरी जाऊन संवाद साधला.

एकीकडे इंग्रजी माध्यमांच्या शाळा व कॉन्व्हेंटमध्ये अगदी पहिल्या दिवसापासून ऑनलाईन वर्ग सुरू आहेत. मात्र, जिल्हा परिषद शाळेत आर्थिकदृष्ट्या गरीब विद्यार्थी शिक्षण घेतात, त्यामुळे त्यांच्याकडे स्मार्टफोन असेलच असे नाही. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना शिक्षण देणे कठीण आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी आँफलाईन शिक्षण देण्याचा उपाय म्हणून शिक्षक सचिन चव्हाण यांनी अतिशय कल्पकपणे ‘घरीदारी शाळा’ हा उपक्रम सुरू केला आहे.

सविस्तर वाचा - ‘मी आजारी असून, हॉस्पिटलमध्ये भरती आहे; उपचारासाठी पैशाची नितांत गरज आहे’ मग...

असा आहे ‘घरीदारी शाळा’ उपक्रम
एखाद्या वॉर्डात जर आठ ते दहा विद्यार्थी जवळ राहात असतील तर त्यांना एकत्र एकाच घरी आणून तिथेच सोशल डिस्टनिंग,मास्कचा वापर,सँनिटायझर आदीचा वापर करून त्यांचा वर्ग घेण्यात येत आहे. मागील महिन्याभरापासून हा उपक्रम आठवड्यातून दोन दिवस हिवरा-हिवरी गावात राबविला जात आहेत. शिक्षक विद्यार्थ्यांना लॅपटॉपवर शिकवितात. विद्यार्थ्यांना नियमितपणे गृहपाठ, स्वाध्याय दिला जातो. दीक्षा ॲप, झूम ॲप, बोलो ॲप, इंग्रजी स्पीकिंग ॲप्स व इतर शैक्षणिक ॲप्स यातून शाळेतील मुलांना अभ्यासात ते मदत करीत आहेत. पाठ्यपुस्तकावर आधारित स्वंयअध्ययन पुस्तिका बनवून त्याची झेरॉक्स काढून विद्यार्थ्यांना मोफत वाटप केले.


संपादन -स्वाती हुद्दार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com