कोरोनाच्या विळख्यात सापडत आहेत गर्भवती माता, नागपुरात दोन दिवसांत ९ जणींना बाधा

pregnant women
pregnant women

नागपूर : थैमान घालणाऱ्या जीवघेण्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव उपराजधानीत दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना विषाणूची बाधा असलेले नवीन वस्तीतील नागरिक आढळून येत आहेत. त्यातच सतरंजीपुरा आणि मोमिनपुरा हे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरल्याने येथील रहिवासी अजूनही कोरोनाबाधित आढळून येत आहेत. बुधवारी (ता.1३) कोरोनाचे आणखी १० रुग्ण वाढले. यामध्ये पाच गर्भवती मातांचा समावेश आहे. मंगळवारी देखील चार गर्भवती मातांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे गर्भवती मातांना कोरोनाचा धोका वाढल्याचे दिसून येत आहे. 

शहरातील पन्नासपेक्षा अधिक वस्त्यांमध्ये सद्यस्थितीत संचारबंदी लागू केली. पोलिस तैनात केले आहेत. येथील नागरिकांना विलगीकरणात पोहोचविण्यात आले आहे. त्यात मंगळवारी 6 जणांची भर पडली. त्यापाठोपाठ बुधवारी देखील आणखी १० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. नव्याने आढळलेले ९ रुग्ण मोमिनपुरा व १ रुग्ण सतरंजीपुरा भागातील असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

शहरात 5 मार्चपासून कोरोना संशयितांचे नमुने तपासणीचे काम मेयो रुग्णालयात सुरू झाले. यानंतर मेडिकल, एम्स, माफसू आणि नीरी या ठिकाणी प्रयोगशाळा सुरू करण्यात आल्या. मात्र, आतापर्यंत या सर्व प्रयोगशाळेतून एकाच दिवशी पाचशेपेक्षा अधिक चाचण्यांची तपासणी करण्यात आली नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com