sakal

बोलून बातमी शोधा

Ninth grade student commits suicide in Nagpur

तिने बाथरूमचा दरवाजा उघडला असता पायाखालची जमीन सरकली. तिने मोठ्याने हंबरडा फोडला. पत्नीचा आवाज ऐकून सचिन हे धावतच वरच्या माळ्यावर गेले. त्यांनी मुलाला गळफास घेतलेल्या अवस्थेत बघितले. त्यांनी पत्नीला सांभाळले. शेजारी जमले. घटनास्थळावर पोलिस पोहोचले. पंचनामा झाला.

शेतातून परतल्यानंतर आई-वडिलांनी घेतला मुलाचा शोध; बाथरूमचा दरवाजा उघडला आणि सर्वच संपल

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : आई-वडील घरी नसताना नवव्या वर्गाच्या विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही हृदयद्रावक घटना सोमवारी नंदनवनमध्ये उघडकीस आली. सर्वेश सचिन माकडे (१४) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत आकस्मिक मृत्यूची नोंद केली. एकुलता मुलगा गमावल्याचे दुःख आईला सहन झाले नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन माकडे हे शेतकरी असून त्यांची कुही शिवारात शेती आहे. ते वृद्ध वडील, पत्नी, मुलगा सर्वेश आणि मुलगी स्विटीसह रमना मारोती परिसरात राहतात. त्यांना सर्वेश हा एकुलता एक मुलगा होता. सर्वेश हा नवव्या वर्गात शिकत होता. त्याचे ऑनलाइन क्लास सुरू होते. तो अभ्यासात जेमतेम होता. काही दिवसांपासून तो तणावात वावरत होता. परंतु, याकडे त्याच्या पालकांचे लक्ष गेले नाही.

पत्नीच्या अनैतिक संबंधातून सेवानिवृत्त जवानाचा खून; पती लवकर घरी आल्याने घडला थरार

रविवारी सचिन हे पत्‍नीसह शेतीवर निघून गेले. सायंकाळी वडील आणि मुलगी खाली टीव्ही बघत होते तर सर्वेश हा वरच्या माळ्यावर गेला. त्याने बाथरूममधील लोखंडी ॲंगलला नायलॉन दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. सायंकाळी माकड दाम्पत्य घरी आले. तेव्हा सर्वेशबाबत विचारणा केली. तो वरच्या माळ्यावर असल्याचे मुलीने सांगितले. त्यामुळे त्याच्या आईने शोधाशोध केली. तो घरात आढळून आला नाही.

तिने बाथरूमचा दरवाजा उघडला असता पायाखालची जमीन सरकली. तिने मोठ्याने हंबरडा फोडला. पत्नीचा आवाज ऐकून सचिन हे धावतच वरच्या माळ्यावर गेले. त्यांनी मुलाला गळफास घेतलेल्या अवस्थेत बघितले. त्यांनी पत्नीला सांभाळले. शेजारी जमले. घटनास्थळावर पोलिस पोहोचले. पंचनामा झाला.

जाणून घ्या - अख्खं गाव हळहळलं! पती-पत्नी पाठोपाठ मुलीचाही मृत्यू, एकाचवेळी निघाली तिघांची अंत्ययात्रा

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत आकस्मिक मृत्यूची नोंद केली. एकुलता मुलगा गमावल्याचे दुःख आईला सहन झाले नाही. त्यामुळे वारंवार बेशुद्ध पडत होती. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सर्वेशच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही.

go to top