esakal | 'मी कोब्रा आहे' या वक्तव्यावरून नितीन राऊतांचा अप्रत्यक्ष टोला, शेअर केला फोटो
sakal

बोलून बातमी शोधा

nitin raut indirectly criticized to mithun chakraborty

बंगालमध्ये २७ मार्च २९ एप्रिल दरम्यान आठ टप्प्यात मतदान होत आहे. त्यासाठी भाजपने चांगलीच कंबर कसली आहे. निवडणूक आयोगाने निवडणुकीची तारीख घोषीत केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिलीच सभा कोलकातामध्ये झाली.

'मी कोब्रा आहे' या वक्तव्यावरून नितीन राऊतांचा अप्रत्यक्ष टोला, शेअर केला फोटो

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर : ज्येष्ठ अभिनेते मिथून चक्रवर्ती यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून त्यादिवशी बंगालमध्ये भाषण देखील केले. 'मी खरा कोब्रा आहे. डंख मारला तर तुमचा फक्त फोटो उरेल', असे मिथून चक्रवर्ती म्हणाले होते. त्यानंतर त्यांचे हे वाक्य चांगलेच चर्चेत आले. त्यालाच ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी अप्रत्यक्षपणे उत्तर दिले आहे. त्यांनी ट्विटरवर कोब्राचा एक फोटो शेअर करत कोणीतरी बंगालमध्ये डोअर टू डोअर निवडणुकीचा प्रचार  करणार असल्याचे त्यामध्ये त्यांनी म्हटलंय. 

हेही वाचा - निसर्ग पर्यटनावरही कोरोनाचा परिणाम, गोरेवाडासह पेंचकडे पर्यटकांची पाठ

बंगालमध्ये २७ मार्च २९ एप्रिल दरम्यान आठ टप्प्यात मतदान होत आहे. त्यासाठी भाजपने चांगलीच कंबर कसली आहे. निवडणूक आयोगाने निवडणुकीची तारीख घोषीत केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिलीच सभा कोलकातामध्ये झाली. यामध्येच अभिनेता मिथून चक्रवर्ती यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. तृणमूल काँग्रसचे माजी राज्यसभा खासदार असलेले मिथून बंगालमध्ये लोकप्रिय आहेत. मिथून यांनी प्रवेशावेळी म्हटले की, 'जो तुमचा हक्क हिरावून घेईन आम्ही त्यांच्या विरोधात संघर्ष करू. हा दिवस माझ्यासाठी स्वप्नवत आहे. इतक्या मोठ्या नेत्यांसोबत मी स्टेजवर असेल असा मी कधीही विचार केला नव्हता. बंगालमध्ये राहणारा प्रत्येक जण बंगाली आहे. मला गरिबांसाठी काम करायचं आहे, तेच माझं स्वप्न आहे.' आता त्यालाच उत्तर देताना नितीन राऊत यांनी एक कोब्राचा फोटो शेअर केला आहे. तसेच कोणीतरी डोअर टू डोअर कॅम्पेन करणार असल्याचे यामध्ये म्हटलंय.

go to top