आम्हीपण डॉक्टर्स ना... मग तुमचा आमच्यावर भरोसा नाही काय?

No homeopathic doctors place in the battle of Corona
No homeopathic doctors place in the battle of Corona

नागपूर :  होमिओपॅथी ही अतिशय प्रभावी आणि अहिंसात्मक उपचारपद्धती आहे, असे विधान महात्मा गांधी यांनी केले होते. छत्रपती शाहू महाराजांनी तर त्यांच्या काळात कोल्हापुरात होमिओपॅथी रुग्णालय उघडून पॅथीला राजमान्यता मिळवून दिली. परंतु, आजच्या विद्यमान शासनाच्या उदासीन धोरणामुळे या उपचारपद्धतीला वनवास मिळाला आहे. 

कोरोनाशी युद्ध सुरू असताना केंद्राने आयुषवर भर दिला. मात्र, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नागपूर आरोग्य उपसंचालक कार्यालनाने प्रकाशित केलेल्या जाहिरातीमध्ये आयुर्वेद आणि युनानी पॅथीतील डॉक्‍टरांकडून नोकरीसाठी आवेदन मागवण्यात आले. मात्र, होमिओपॅथी डॉक्‍टरांना डावलण्यात आले आहे. विशेष असे की, हजारो होमिओपॅथ डॉक्‍टरांनी ब्रीज कोर्स केला असूनही त्यांना नोकरीसाठी पात्र ठरवण्यात आले नसल्याची खंत होमिओपॅथ डॉक्‍टरांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

हॅनिमन यांनी ही पॅथी शोधून काढली. अतिशय स्वस्त आणि प्रभावी उपचारपद्धती म्हणून आज ही मान्यताही पावली आहे. महाराष्ट्र सोडून इतर राज्यांत नोंदणीसाठी स्वतंत्र संचालनालय आहे. बिहारसारख्या मागासलेल्या राज्यात स्वतंत्र संचालनालय आहे. नागपूर जिल्ह्यात सुमारे बारा हजार डॉक्‍टरांना कुठलेही शासकीय संरक्षण नसताना आपला व्यवसाय करीत आहेत. महाराष्ट्रात दरवर्षी दोनशे विद्यार्थी परीक्षा देऊन डॉक्‍टर होतात. 

कोरोनाच्या या आणीबाणीमध्ये बीएएमस (आयुर्वेद) तसेच बीयुएमएस (युनानी) डॉक्‍टरांना खेड्यात सेवा देण्यासाठी शासनाकडून नियुक्ती देण्यात येत आहेत. परंतु, होमिओपॅथी डॉक्‍टरांवर अन्याय करण्यात आला आहे. राज्यात 73 हजार होमिओपॅथ आहेत. पूर्व विदर्भात सुमारे चार हजारापेंक्षा अधिक होमिओपॅथ डॉक्‍टर आहेत. यांना कोरोनाशी सुरू झालेल्या या लढाईत दूर का ठेवण्यात येत आहे, असा सवाल डॉ. मनीष पाटील यांनी केला आहे. 

बृहमुंबई महानगरपालिकेत निर्णय

कोविड-19च्या या लढाईत बृहमुंबई महानगरपालिकेद्वारे प्रकाशित केलेल्या जाहिरातीमध्ये होमिओपॅथी डॉक्‍टरांना स्थान देण्यात आले. मग नागपूरच्या आरोग्य उपसंचालक कार्यालयाने प्रकाशित केलेल्या जाहिरातीमध्ये होमिओपॅथ डॉक्‍टरांना का सामावून घेण्यात आले नाही, असा सवाल डॉ. मीनष पाटील यांनी केला.

मुख्यमंत्र्यांना निवेदन

होमिओपॅथी डॉक्‍टरांना कोरोनाशी लढताना त्यांनाही शासन सेवेत सामील करून घेणयत यावे या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, आरोग्य मंत्री राजेश टोपे, नागपूर जिल्ह्याते पालकमंत्री डॉ. नितीन राऊत तसेच आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांना देण्यात आले आहे, अशी माहिती डॉ. पाटील यांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com