शेतात नव्हे, अहो मुख्य रस्त्यावर रोवले की धानाचे पऱ्हे...

 कुही  : ग्रामपंचायत प्रशासनाचा निषेध म्हणून मांढळच्या रस्त्यावर रोवणी करताना युवक.
कुही : ग्रामपंचायत प्रशासनाचा निषेध म्हणून मांढळच्या रस्त्यावर रोवणी करताना युवक.

मांढळ (जि.नागपूर) : कुणाच्या डोक्‍यात काय येईल, हे सांगता येत नाही. कुही तालुक्‍यातील व्यापारी नगरी म्हणून ख्याती असलेले मांढळ गाव. गाव म्हणण्याऐवजी आता मोठे शहर म्हणून ते तालुक्‍यात नावारूपाला आले आहे. गावातील वैद्य चौकातील मुख्य रस्ता. परंतू हा चौक आता नागरिकांच्या या कृत्याने बराच चर्चेत आला नसेल, तेवढा या रस्त्याच्या दुदर्शेमुळे प्रसिद्‌ध झाला आहे. मार्गाच्या दूरवस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी नागरिकांनी मात्र यावेळी अफलातून मार्ग निवडला आहे.

अधिक वाचा : बापरे! भूमिहीन शेतकऱ्यांच्या नावे शंभर कोटींचे कर्ज? ठगबाजांचा अखेर असा भरला घडा...

प्रशासनाचा केला निषेध
मांढळच्या वैद्य चौकातील मुख्य रस्ता दरवर्षीप्रमाणे यंदाही चिखलयुक्त रस्ता झाला. ग्रा.पं.च्या या अशा कार्यपद्धतीचा निषेध म्हणून तेथील रहिवाशांनी रस्त्यातील चिखलात चक्क धानाचे पऱ्हे रोवली व ग्रामपंचायतच्या ढिसाळ नियोजनाविषयी घोषणा दिल्या. मांढळच्या परिसरातील 25 गावांचा रोजचा या शहराशी संपर्क येतो. मांढळ गावातील बसस्थानकावरून गावात प्रवेश केल्यानंतर सिव्हिल लाईन व्यापारी प्रतिष्ठाने दिसतात. समोरच बॅंक ऑफ महाराष्ट्रची शाखा आहे. या बॅंकेच्या समोरच वैद्य चाळीच्या दुकानापुढे मुख्य रस्त्यावर काल झालेल्या पावसामुळे एवढा चिखल झाला आहे की सद्याच्या धान रोवणीकरिता ज्याप्रमाणे शेत तयार करावे त्यासाठी जसा चिखल करावा लागतो, तसाच चिखल या25 ते30 फुटाच्या अंतरात रस्त्यावर झालेला आहे. यासंबंधी ग्रा.पं.प्रशासनाला वारंवार सूचना करण्यात आल्यात. परंतू ग्रा.पं.ने नेहमीच या रस्त्याकडे कमालीचे दुर्लक्ष केले आहे.

अधिक वाचा  : सावधान ! आता चोरांनाही वाटत नाही बरं, कोरोनाची भीती, कशी ते बघाच...

त्रास होतो नागरिकांना
आज येथील रस्त्यावरील चिखल एवढा झाला की येथून ये-जा करणेही कठीण झाले आहे. ग्रा.पं. प्रशासनास अवगत करूनही साधे मुरूम किंवा बारिक चुरी टाकून रस्ता रहदारीस योग्य करता आला असता. परंतू ग्रा.पं.या बाबीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे. याचा त्रास मात्र नागरिकांना सहन करावा लागतो. याच बाबीचा निषेध म्हणून येथे राहणाऱ्या नागरिकांनी चक्क धानाचे पऱ्हे रोवून काढली. यावेळी वार्ड क्र.3 चे सदस्य धनपाल लोहारे, स्वप्नील राऊत, धनराज निरगुळकार, भगवान मेश्राम, प्रमोद निनावे, सूर्यवंशी, राजू वैद्य आदी दुकानदार व नागरिक उपस्थित होते.
  

संपादन  : विजयकुमार राऊत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com