मर्जीतील अर्जदारालाच त्रुटींची माहिती, वाचा सविस्तर

नीलेश डोये
Wednesday, 16 September 2020

अर्जामध्ये काही त्रुटींबाबतची मोजक्याच आणि मर्जीतील अर्जदारास सांगण्यात येत असून राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन (एनआरएचएम)मधील अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून संधीचा फायदा घेण्यात येत असल्याचे सांगण्यात येते.

नागपूर : कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आरोग्य यंत्रणेतील मनुष्यबळही कमी पडत असल्याने कंत्राटी पद्धतीवर कर्मचारी भरतीबाबत शासनाने निर्देश दिले आहेत. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने ही भरती सुरू केली असून विविध पदांकरिता शेकडो अर्ज आले आहेत.

अर्जामध्ये काही त्रुटींबाबतची मोजक्याच आणि मर्जीतील अर्जदारास सांगण्यात येत असून राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन (एनआरएचएम)मधील अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून संधीचा फायदा घेण्यात येत असल्याचे सांगण्यात येते. आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पाठबळातून हा सर्व प्रकार होत असल्याची चर्चा आहे.

ग्रामीण भागामध्येही लक्षणे नसलेल्या मात्र पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णाला होम आयसोलेशन किंवा कोविड केअर सेंटरमध्ये (सीसीसी) उपचार दिले जात आहेत. यासाठी आरोग्य विभागाकडे असलेल्या मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेता शासनानेही सीसीसीसाठी आवश्यक डॉक्टर, नर्स आदी स्टाफ नियुक्त करण्याची मुभा दिली आहे.

आदर्श शिक्षक पुरस्कार’वरून माहिला पदाधिकाऱ्यांमधील शीतयुद्ध पेटणार!

तीन महिन्यांकरिता त्यांना नियुक्ती दिली जात आहे. त्यांच्या माध्यमातून या रुग्णांची देखरेख करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे व सीईओ योगेश कुंभेजकर यांनी सांगितले होते. यासाठी शेकडो लोकांनी अर्ज केलेत. अर्जांची छाननी करण्याचे काम एनआरएचएमच्या जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक यांची आहे. त्रुटी असलेल्या अर्जदाराला या त्रुटीबाबत पूर्ततेसंबंधात कुठलीही माहिती कळविण्यात येत नसल्याचा आरोप अनेक अर्जदारांकडून करण्यात येत आहे.

मर्जीतील आणि आर्थिक मैत्री असलेल्या अर्जदाराच्या अर्जातील त्रुटी पूर्ण होत असल्याचा आरोपही होत आहे. सीईओ कुंभेजकर संकटावर मात करण्यासाठी यंत्रणा सक्षम करण्याच्या प्रयत्नात असून दुसरीकडे अधिकारी मात्र याचा फायदा घेत असल्याचे दिसत आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Notice of errors to preferred applicant