esakal | शौकिनांनो सावधान ! बनावट तंबाखू खाणे उठू शकते जीवावर...
sakal

बोलून बातमी शोधा

file

टाळेबंदीमुळे मात्र तंबाखूच्या पूर्वी सुरू असलेल्या पुरवठ्यावर परिणाम होऊन तो जवळपास ठप्प झाला आहे. त्यावर पर्याय म्हणून वेग वेगळ्या ब्रॅंडच्या बनावट तंबाखूचा मार्केटमध्ये प्रवेश झालेला आहे. 50 व 200 ग्रॅमच्या पाकिटात येणाऱ्या तंबाखूची किंमत फार कमी आहे. परंतु, येथील विक्रेते मूळ किमतीच्या तिप्पट चौपट रक्‍कम घेऊन हा बनावट तंबाखू पानठेलेवाल्यांना विकत आहेत.

शौकिनांनो सावधान ! बनावट तंबाखू खाणे उठू शकते जीवावर...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

भिवापूर (जि.नागपूर) : टाळेबंदी तंबाखूविक्रेत्यांसाठी खुपच फायद्याची ठरत आहे. राज्यात प्रतिबंधित असलेल्या सुगंधित तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची चौपट दरात विक्री करून शहरातील काही व्यावसाईक रग्गड पैसा कमावत आहेत. किराणा दुकानाच्या आड ही तंबाखूविक्री सुरू असून यात बनावट तंबाखूचे प्रमाण मोठे आहे. हा बनावट तंबाखू आरोग्यास घातक असून त्यामुळे खाणाऱ्यांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होण्याची दाट शक्‍यता आहे.


सविस्तर वाचा  :  नागपुरात आणखी एका कोरोना रूग्णाचा मृत्यू, काळजी घ्या...

पर्याय म्हणून वेगळया ब्रॅंडचा तंबाखू
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मागील सहा आठवड्यांपासून राज्यात टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. टाळेबंदीमुळे जीवनावष्यक वस्तू व औषध दुकाने वगळता इतर दुकाने बंद आहेत. त्यात पान व खर्रा दुकानांचाही समावेश असल्याने सुरुवातीला शौकिनांचे वांधे झाले होते. यावर उपाय काढत दुकानचालकांनी त्यांच्या घरून खर्रे तयार करून विकणे सुरू केले. जिल्ह्यात खर्रा खाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. खर्ऱ्यात वापरल्या जाणाऱ्या तंबाखूच्या विक्रीवर राज्य शासनाने यापूर्वीच बंदी घातली आहे. परंतु बंदी असली तरी, चोरट्या मार्गाने तंबाखूचा पुरवठा सुरळीत सुरू होता.

सविस्तर वाचा  : चिंता नको, नागपूर जिल्हा परिषदेने क्‍वारंटाइनसाठी केली उत्तम सोय

चौपट किंमत वसूल
टाळेबंदीमुळे मात्र तंबाखूच्या पूर्वी सुरू असलेल्या पुरवठ्यावर परिणाम होऊन तो जवळपास ठप्प झाला आहे. त्यावर पर्याय म्हणून वेग वेगळ्या ब्रॅंडच्या बनावट तंबाखूचा मार्केटमध्ये प्रवेश झालेला आहे. 50 व 200 ग्रॅमच्या पाकिटात येणाऱ्या तंबाखूची किंमत फार कमी आहे. परंतु, येथील विक्रेते मूळ किमतीच्या तिप्पट चौपट रक्‍कम घेऊन हा बनावट तंबाखू पानठेलेवाल्यांना विकत आहेत.ग्राहकांची खर्ऱ्याची मागणी पूर्ण करण्यासाठी पानठेलेचालक नाइलाजाने हा बनावट तंबाखू आगावू पैसे देऊन खरेदी करीत आहेत. हा सगळा प्रकार उघडपणे सुरू आहे. परंतु, त्याकडे कुणी लक्ष देत नसल्याने तंबाखू विक्रेत्यांचे चांगलेच फावत आहे.

सविस्तर वाचा  :  अब डाकीया डाक लाया, नही, "किसान रथ' भी साथ लाया...

पानठेलेचालक लपून करतात व्यवहार
येथील शिवाजी ले-आउट परिसरातील तीन किराणा दुकानांमधून प्रतिबंधित असलेल्या तंबाखूची मोठ्या प्रमाणात विक्री सुरू आहे. यासोबतच वॉर्ड क्रमांक 12 मध्ये एक, दिघोरा परिसरात एक व डायमंड बारच्या बाजूला असलेल्या झोपडपट्टीतील एका किराणा दुकानामध्ये तंबाखू विक्री धडाक्‍यात सुरू आहे. वरीलपैकी शिवाजी ले आउट व वॉर्ड क्रमांक 12 मधील दुकानचालक हे तंबाखूचे ठोक विक्रेते आहेत. तंबाखू सोबतच खर्ऱ्यात लागणारी सुपारीसुद्धा येथे मोठ्या प्रमाणात विकल्या जात आहे.

सविस्तर वाचा  : नवरी म्हणे नव-याला, आधी मास्क बांधू तोंडाला !

उमरेडवरून होतो तंबाखूचा पुरवठा
उमरेड येथील काही व्यापारी हे बनावट तंबाखूविक्रीचा धंदा करीत असल्याची पक्की माहिती आहे. स्थानिक दुकानदार दुचाकी किंवा चारचाकी वाहनाने उमरेडवरून तंबाखू आणून येथे त्याची भरमसाठ किमतीत विक्री करतात. टाळेबंदी सुरू व्हायच्या आधी नागभीड, पवनी व चिमूर येथून प्रतिबंधित तंबाखूचा येथे पुरवठा सुरू होता. परंतु, टाळेबंदी सोबतच जिल्हाबंदी करण्यात आल्याने या पुरवठ्याला "ब्रेक' लागला आहे.