आता खुद्द जनताच विचारतेय, मौदा नगरपंचायत काम करते की राजकारण?

file
file

मौदा (जि.नागपूर): कन्हान नदीला २९ व ३० ऑॅगस्ट रोजी आलेल्या महापुरामुळे जलवाहिनी वाहून गेली. परंतु नगरपंचायतच्या हलगर्जीपणामुळे स्थिती आताही ‘जैसे थे’ आहे. याचा फटका सुमारे १५ हजार नागरिकांना बसतो आहे. कन्हान नदीमध्ये ३० एचपीच्या दोन मोटारपंप लाऊन विहीर बांधण्यात आली आहे.  त्यामधून फिल्टर प्लांटमध्ये पाणी येऊन शहराला वितरित होत होते. परंतु सुमारे २५ फूट उंच जलवाहिनीची संपूर्ण पाईपलाईन पुरामुळे पडली. काही दिवस शहरातील १७ वार्डात टँकरने पाणी पुरविले जात होते. आता शहरात कसेतरी मोटार लावून एक दिवसा आड पाणी पुरवणे सुरू आहे. नळाला पाणी कधी दूषित येते तर कधी कचरा येतो आहे. तालुक्यात कोरोनाचे रुग्ण कमी झाले. परंतु दुषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.  परिणामी नगरपंचायतची काम करण्याची इच्छा असल्याचे दिसून येत नाही.

अधिक वाचाः अखेर ‘तो’ पश्‍चातापदग्ध अंतकरणाने म्हणाला, साहेब, माफ करा हो चूक झाली !

मिळतात उलटसुलट उत्तरे
मुख्याधिकाऱ्यांशी नगरसेवक पाण्याच्या बिकट समस्येवर  बोलले तर त्यांनाच उलटी उत्तरे मिळत आहेत. एकीकडे नगरपंचायतजवळ पुरेसा फंड नाही, अशी ओरड आहे तर दुसरीकडे मुख्याधिकारी कोमल तराळे नगरसेवकांचे ऐकून घेण्यास तयार नाहीत. त्यामुळे वार्डातील लोकांचे बोलणे नगरसेवकांना ऐकावे लागत आहे. अशी प्रतिक्रिया  उपनगराध्यक्ष शालिनी कुहिकर, नगरसेवक किशोर सांडेल, नगर सेविका विमल पोटभरे, नगरसेवक भीमराव गजभिये यांनी दिली. मुख्याधिकारी यांना फोन केले असता फोनचे उत्तर मिळाले नाही.

नगरपंचायत प्रशासनाची इच्छाशक्तीच नाही.
मौदा नगरपंचायतचे मुख्याधिकारी व नगराध्यक्ष  निष्क्रिय असल्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो आहे. प्यारेलाल कनेक्शन करून शहराला पाहिजे त्या क्षमतेने पाणी पुरवठा करू शकतात पण त्यांनी ते केले नाही. नगरपंचायत मुख्याधिकारी व नगराध्यक्षा कुंभकर्णी झोपेत आहेत. यांची काम करण्याची इच्छाशक्तीच नाही. त्यामुळे शहरातील नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतो आहे, अशी परिस्थिती शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख देवेंद्र गोडबोले यांनी व्यक्त केली.तर मौदा शहरात पाण्याची बिकट समस्या आहे. जलवाहिनी तुटलेली आहे. याचे काम कसे होईल याबद्दल मुख्याधिकारी यांना विचारणा केली असता उत्तरे मिळत नाहीत. आॅनलाईन सभा घेत आहेत. इंटरनेटचा प्रॉब्लेम असल्यामुळे काय बोलत आहेत हे समजत नाही. सभागृहात सभा घ्या असे पत्र दिलेले आहे, परंतु मुख्याधिकारी व नगराध्यक्ष याकडे कानाडोळा करीत असल्याचा आरोप नगरसेवक व गटनेते किशोर सांडेल यांनी केला.

 मुख्याधिकारी म्हणतात, स्वखर्चाने वॉर्डात पाणी पुरवठा करा
मुख्याधिकाऱ्यांना पाण्याची समस्या सांगितली. दोन दिवसातून एकदा नळ येत आहेत तेही कमी वेळासाठी येत आहेत. त्यामुळे शहरातील व वॉर्डातील लोकांना पुरेसे पाणी मिळत नाही त्यांची तक्रार आमच्याकडे येत असते. मी मुख्याधिकारी यांना पाण्याचा पुरवठा दहा मिनिटे जास्त करा अशी विनंती केली. परंतु त्यांनीच मला आपल्या वार्डात स्वखर्चाने ट्रॅकर लावून पाणी पुरवठा करा असे उत्तर दिले.
विमलताई पोटभरे
नगरसेविका नगरपंचायत मौदा उपगटनेता भाजपा.

निधी नसल्यामुळे पाणी पुरवठा एक दिवसा आड
मौदा नगरपंचायतला निधी उपलब्ध नाही. मुख्याधिकारी निधी आणण्याकरिता मुंबईला गेले होते परंतु निधीचे काम प्रोसेस मध्ये आहे. आता टेम्परवरी पाणी नदीतून काढणे सुरु आहे व शहराला पुरवणे सुरु आहे. जोपर्यंत जलवाहिनीचा काम पूर्ण होत नाही तो पर्यंत दररोज पाणी पुरवठा करता येणार नाही. पाणी पुरवठा एक दिवसा आड करीत आहोत.
देविदास कुंभलकर
सभापती पाणीपुरवठा व नगरसेवक न. पं. मौदा

संपादनः विजयकुमार राऊत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com