दिलासादायक! नागपुरात कोरोना बाधितांच्या मृत्यूचे प्रमाण घटले; आज नवे ४३६ रुग्ण तर अवघ्या ३ जणांचा मृत्यू 

Number of deaths of corona patients are decreasing in Nagpur
Number of deaths of corona patients are decreasing in Nagpur
Updated on

नागपूर ः मागील पंधरा दिवसांपासून दर दिवसाला सरासरीने दहा मृत्यू होत आहेत. बुधवारी मात्र ४३६ कोरोना बाधितांची नव्याने भर पडली असली तरी मृत्यू मात्र घटले आहेत. नागपूर जिल्ह्यात अवघ्या ३ मृत्यूंची नोंद झाली आहे.

ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर प्रथमच जिल्ह्यात बाधितांच्या मृत्यूचा नीचांक नोंदवण्यात आला आहे. २४ तासांत झालेल्या ३ मृत्यूंपैकी २ शहरातील आहेत तर एक जिल्ह्याबाहेरील मृत्यू आहे. यामुळे प्रशासनाला जरा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात कोरोनाच्या मृत्यूचे सत्र सुरू झाल्यानंतर पहिल्यांदा कोरोनाबाधितांच्या शून्य मृत्यूची नोंद ग्रामीण भागात झाली आहे. 

शहरी भागात २ जण दगावले. यामुळे शहरातील आजपर्यंतच्या मृत्यूची संख्या २ हजार ५९९ तर ग्रामीण भागातील कोरोनाबाधितांची मृत्यू संख्या ६६२ वर पोहोचली आहे. जिल्हाबाहेरील ५५५ मृत्यू नोंदवले गेले. तर एकूण बाधितांच्या मृत्यूची संख्या ३ हजार ८१६ वर पोहचली आहे. बुधवारी शहरात ३४९ कोरोनाबाधित तर ग्रामीण ८६ बाधितांची नोंद झाल्याने ४३६ नव्याने बाधितांची भर पडली आहे. यामुळे बाधितांची एकूण संख्या १ लाख १८ हजार ३४७ वर पोहचली आहे. 

यापैकी शहरातील संख्या ९३ हजार ६८० झाली आहे. तर ग्रामीण भागातील संख्या २३ हजार ९३० झाली आहे. जिल्हाबाहेरून रेफर झालेल्या बाधितांची संख्या ७३७ आहे. दिवसभरात शहरात १७५, ग्रामीणला ५६ अशा एकूण २३१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे आजपर्यंतच्या शहरातील कोरोनामुक्तांची संख्या ८६ हजार ८, तर ग्रामीण भागातील कोरोनामुक्तांची संख्या २२ हजार ५४७ झाली आहे. आतापर्यंत १ लाख ८ हजार ५५५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. बुधवारी ५ हजार ७३ रुग्ण, ग्रामीणला ९०३ असे एकूण ५ हजार ९७६ सक्रिय कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. त्यातील गंभीर संवर्गातील १ हजार १ रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. तर ४ हजार ९३९ रुग्णांवर गृह विलगीकरणात उपचार सुरू आहेत.

८ लाख ६६ हजार कोरोना चाचण्या

बुधवारी ५ हजार ९२० चाचण्यांची भर पडल्यानंतर कोरोनाशी लढताना मागील ११ महिन्यात नागपूर जिल्ह्यात सुमारे ८ लाख ६६ हजार ९३३ चाचण्या झाल्या आहेत. यापैकी ५ लाख १५ हजार २९६ आरटीपीसीआर चाचण्या झाल्या आहेत. तर ३ लाख ५१ हजार ६३७ रॅपिड ॲन्टिजेन चाचण्या झाल्या आहेत.


संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com