काय म्हणता? चक्क महापौर संदीप जोशी चौकात मारणार दंड-बैठका

oho, Mayor Sandeep Joshi will exercise in open space
oho, Mayor Sandeep Joshi will exercise in open space

नागपूर : कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी व्यायाम करण्याचे सल्ले अनेक तज्ज्ञांकडून दिले जात आहे. मात्र व्यायामाचे जिम का बंद ? असा सवाल शहरातील जिममालकांनी केला आहे. जिम सुरू करण्याबाबत महापौर संदीप जोशी यांनीही आयुक्तांना पत्र दिले. परंतु स्थानिक स्तरावर कुठलेही पाऊल उचलण्यात आले नाही. उद्या जिममालकांचे आंदोलन असून महापौर संदीप जोशी आंदोलनाला समर्थन देताना संविधान चौकात व्यायाम करणार आहेत.

लॉकडाऊनमध्ये शिथिलता देताना मिशन बिगीन अगेनअंतर्गत सर्व व्यवसाय सुरू करण्याची परवानगी दिली. परंतु जिममालकांसोबत भेदभाव केला जात असून उद्या, १९ ऑगस्ट रोजी शहरातील सर्व जिममालक आंदोलन करणार आहेत. शहरातील जिममालकांंनी महापौर संदीप जोशी यांंना काल, जिम सुरू करण्याबाबत निवेदन दिले.

दारुची दुकाने, केश कर्तनालय व अन्य व्यवसाय सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली. जिम हा व्यवसाय व्यायामाशी संबंधित आहे. जिम मालक कोव्हिडसंदर्भातील सर्व नियम पाळण्यास तयार असतानाही अद्याप सुरू करण्यास परवानगी का देण्यात आली नाही? याबाबत महापौर संदीप जोशी यांनीही आश्चर्य व्यक्त केले.

तीन दिवसांपूर्वी मनपा आयुक्तांना पत्र लिहून जिम सुरू करण्यासंदर्भात सकारात्मक विचार करण्याची सूचना केली. मात्र अद्यापही शासन स्तरावरून अथवा स्थानिक स्तरावरून जिमबाबत निर्णय झाला नाही. तीन दिवसांपूर्वी महापौर संदीप जोशी यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात जिम मालक आंदोलन करू शकतात, याबाबत पूर्वकल्पना दिली होती.

या आंदोलनात सहभागी होण्याची विनंती जिम मालकांनी महापौरांना केली होती. त्यानुसार उद्या महापौर संदीप जोशी आंदोलनात सहभागीच होणार नाही तर व्यायाम करून मनपा प्रशासनाच्या दिरंगाईचा निषेधही करणार आहे.
 
दोनशेवर जिमसमोर ग्राहकांची निदर्शने
शहरातील २२२ जिम समोर जिममध्ये वर्कआउट करणारे पाच जण सोशल डिस्टंनसिंग ठेवून निदर्शन करणार आहेत. या सर्वांचे प्रातिनिधिक निदर्शने संविधान चौकामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या बाजूला पाच बॉडी बिल्डर करतील. जिममध्ये नियमित जाणारी व्यक्ती म्हणून स्वतःही आंदोलनात सहभागी होणार असल्याचे महापौर संदीप जोशी यांनी सांगितले.
 
आमदार, खासदारही होणार आंदोलनात सहभागी
कोतवालनगरात खासदार डॉ. विकास महात्मे व आमदार अनिल सोले, मानेवाडा रोड व अयोध्यानगरात आमदार मोहन मते आंदोलनात सहभागी होतील. इंदोरा चौकात माजी आमदार डॉ. मिलिंद माने, राम कुलर रोडवर प्रमोद चिखले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आमदार कृष्णा खोपडे, बडकस चौकात आमदार प्रवीण दटके, झेंडा चौक महाल येथे आमदार गिरीश व्यास आणि अग्रसेन चौकात आमदार विकास कुंभारे आंदोलनात सहभागी होतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com