esakal | उशीर झाला तर मुक्काम करेन असं पत्नीला सांगितलं, पण सकाळी फोन खणखणला अन् सर्वच संपलं
sakal

बोलून बातमी शोधा

one died in two wheeler accident in katol of nagpur

वेळ लागल्यास मुक्काम करणार असल्याचे पत्नीला सांगितले. परंतु, काम आटोपून परतीला निघाले. मात्र...

उशीर झाला तर मुक्काम करेन असं पत्नीला सांगितलं, पण सकाळी फोन खणखणला अन् सर्वच संपलं

sakal_logo
By
विजयकुमार राऊत

काटोल (जि. नागपूर ) : तालुक्यातील सावळी नदीवरील पुलावरून दुचाकी कोसळून एकाचा मृत्य झाला. सुरेशसिंह बाबूलालसिंह ठाकूर (वय५३, सावळी), असे मृताचे नाव असून ही घटना रविवारी रात्री घडली.

हेही वाचा - अजित पवार यांनी पदोन्नतीत आरक्षणाचा विषय टाकला...

सावली येथील अनिल सातपुते फिरावयास गेले असता त्यांना २५ फूट सावळी पुलाखाली दुचाकी(एमएच३१,एएक्स२१५८) पडलेली आढळली. त्यांनी सावळी गावात शेजारी कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली. प्राप्त माहितीनुसार, सुरेशसिंह रात्री साडेआठ वाजता बाहेरगावी गेले होते. वेळ लागल्यास मुक्काम करणार असल्याचे पत्नीला सांगितले. परंतु, काम आटोपून परतीला निघाले. मात्र, गावापासून अर्धा किलोमीटर दूर असलेल्या पुलावरून जात असताना समोरून येणाऱ्या वाहनाच्या प्रखर लाईटमुळे रस्ता दिसला नाही. त्यामुळे वाहन पुलावरून खाली कोसळले असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह बाहेर काढला. त्यांना मृतदेह काटोल येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले. घटनेचा पुढील तपास काटोल पोलिस करत आहेत.

हेही वाचा - भंडारा अग्निकांड : श्‍वसनाचा त्रास आणि डोळ्यातून सतत पाणी गळत असल्याने बाळाचा मृत्यू...

दरम्यान, मृत सुरेशसिंह यांचे धाकटे बंधू सुरतला गेले असल्याने अंतिम संस्कार आज सकाळी ११ वाजता करण्यात आले. त्यांच्या पश्चात वृद्ध पिता, चार भाऊ, पत्नी, मुलगा शैलेंद्र, दिव्यम दोन मुले असा आप्तपरिवार आहे. 


 

go to top