
नागपूर : उपराजधानीत मागील पन्नास दिवसांत कोरोनाबाधितांची संख्या दीडशेवर पोहोचली आहे. सतरंजीपुरा येथील कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला आणि त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींमुळे उपराजधानीत उद्रेक झाला. कोरोनाच्या संख्येवर नियंत्रण राहिले नाही. 24 तासांत 14 जणांची वाढ झाली आहे. यात अवघ्या 16 महिन्यांची चिमुकली बाधित झाली आहे. यामुळे शहरातील बाधितांचा आकडा 152 वर पोहोचला आहे. यातील 48 जणांनी कोरोनावर मात केली तर दोघांचा मृत्यू झाला. उर्वरित 98 बाधितांवर मेयो-मेडिकलमध्ये उपचार सुरू आहेत.
अखिल भारतीय आयुविज्ञान संस्थेच्या (एम्स) प्रयोगशाळेच्या अहवालातून 16 महिन्यांच्या चिमुकलीसह 9 आणि 19 वर्षांची मुलगी पॉझिटिव्ह आढळली. याशिवाय 30 वर्षांच्या दोन महिला आणि 60 आणि 64 वर्षे वयाच्या दोन वृद्ध महिलांचा समावेश आहे. 14, 25 आणि 28 वर्षीय पुरुषही येथील प्रयोगशाळेतून कोरोनाबाधित असल्याचा निष्कर्ष पुढे आला. मेडिकलच्या प्रयोगशाळेच्या अहवालातून 45 वर्षीय महिला बाधित आढळली.
नीरी प्रयोगशाळेतही एका तरुणाला विषाणूची बाधा असल्याचे पुढे आले आहे. नागपुरातील मेडिकल, मेयो, एम्ससह नीरीमधील प्रयोगशाळेतून आतापर्यंत 152 बाधितांची नोंद झाली आहे. त्यातील सत्तर टक्के रुग्णांना सर्दी, खोकला, ताप, श्वसनाचा कोणतीही त्रास दिसून आला नाही. मात्र, कोरोनाबाधित अहवाल प्राप्त झाला.
उपराजधानीतील मेयो, मेडिकल, नीरी, पशुवैद्यक आणि एम्स अशा पाच प्रयोगशाळेतून 50 दिवसात सुमारे शहरातील 3,544 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. बजाजनगर, खामला, जरिपटका, मोमीनपुरा, भालदारपुरा, दलालपुरा, उप्पलवाडीसह नुकतेच डोबीनगर येथील कोरोनाबाधित रुग्णांच्या चाचणी करण्यात आल्या. सर्वाधिक चाचण्या सतरंजीपुरा परिसरातील नागरिकांच्या करण्यात आल्या आहेत. येथील सुमारे पंधराशे व्यक्तींचे नमुने तपासण्यात आले असल्याची माहिती सुत्रांनी दिली. आमदार निवास, सिम्बॉयसीस, व्हीएनआटी, वनामती, पाचपावली येथील पोलिस वसाहत, लोणारा, तसेच रविभवनसह इतर विलगीकरण केंद्रात सध्या 1 हजार 841 व्यक्तींचे विलगीकरण केले आहे. शनिवारी सुटी असूनही शहरातील प्रयोगशाळांमध्ये 301 जणांचे नमुने तपासण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.