या विद्यापीठात अंतिम वर्षाच्या परीक्षेसाठी एक लाखावर प्रश्न...वाचा

मंगेश गोमासे
Saturday, 19 September 2020

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर परीक्षा घेण्यास सुरुवात झाली आहे. कोरोनाचे संकट बघता परीक्षा पद्धतीत बदल करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर येऊन नेहमीप्रमाणे तीन तासांचा पेपर सोडवावा लागणार नाही. तर, एमसीक्यू पद्धतीने मोबाईलवर पेपर सोडवइता येणार आहे. परीक्षेची सगळी पद्धत बदलण्यात आल्याने प्राध्यापकांना आता दुप्पट काम करावे लागत आहे. आधी लेखी परीक्षेसाठी प्रश्नसंच तयार केले होते. तर आता ऑनलाइन परीक्षेसाठी एमसीक्यू तयार करावे लागत आहे.

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने सुरू केलेली ऑनलाइन बहुपर्यायी (एमसीक्यू) परीक्षेची तयारी आता पूर्ण होत आली आहे. विविध विद्याशाखांच्या एकूण १८०० पैकी ५००हून अधिक विषयांसाठी १ लाख ९ हजार ९१४ प्रश्न तयार करण्यात आले आहेत. येत्या दोन-तीन दिवसांत एमसीक्यूची प्रश्नबँक तयार होणार असल्याचे परीक्षा विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर परीक्षा घेण्यास सुरुवात झाली आहे. कोरोनाचे संकट बघता परीक्षा पद्धतीत बदल करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर येऊन नेहमीप्रमाणे तीन तासांचा पेपर सोडवावा लागणार नाही. तर, एमसीक्यू पद्धतीने मोबाईलवर पेपर सोडवइता येणार आहे. परीक्षेची सगळी पद्धत बदलण्यात आल्याने प्राध्यापकांना आता दुप्पट काम करावे लागत आहे. आधी लेखी परीक्षेसाठी प्रश्नसंच तयार केले होते. तर आता ऑनलाइन परीक्षेसाठी एमसीक्यू तयार करावे लागत आहे.

शिक्षक मतदार संघात शिक्षकांचा मतदानाचा अधिकार येणार संपुष्टात

विद्यापीठाच्या कोणत्याही परीक्षा याआधी या पद्धतीने झालेल्या नाहीत. त्यामुळे प्राध्यापकांसाठीही हा पहिलाच प्रयोग आहे. ऑनलाइन परीक्षेसाठी अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. या अ‍ॅपद्वारे विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षा देता येणार आहेत. तर, अ‍ॅप तयार झाल्यानंतर पुढील आठवड्यात विद्यार्थ्यांची उजळणी परीक्षा घेण्यात येणार आहे. त्या उजळणी परीक्षेमध्ये दिसणाऱ्या उणिवा दूर करण्यात येतील, असे परीक्षा विभागाने सांगितले.

२३ ते २७ दरम्यान मॉक टेस्ट
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने सुरू केलेली ऑनलाइन बहुपर्यायी (एमसीक्यू) परीक्षेची तयारी प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांसाठी नवीनच आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात ऑनलाइन परीक्षेची भीती संपावी यासाठी विद्यापीठाने २३ ते २७ सप्टेंबरदरम्यान मॉक टेस्टचे आयोजन केले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One lakh questions for final year exams in this university