शुल्क भरले तरच ऑनलाइन शिक्षण...वाचा कोण म्हणतयं

मंगेश गोमासे
Thursday, 6 August 2020

कोरोना आणि टाळेबंदीमुळे यंदाचे शैक्षणिक क्षेत्राचे संपूर्ण वेळापत्रक विस्कटले आहे. शाळा बंद असल्या तरी शिक्षण थांबायला नको, अशी भूमिका घेत राज्य शासनाने ऑनलाइन वर्गांना अखेर परवानगी दिली. मात्र, खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी केवळ व्यावसायिक दृष्टिकोनातून शासनाच्या आदेशाआधीच जून महिन्यापासून ऑनलाइन वर्गांना सुरुवात केली. कोरोनामुळे मार्च महिन्यापासून शाळा बंद असल्या तरी शुल्क भरण्यासाठी पालकांवर दडपण आणले जात आहे.

नागपूर : सीबीएसई आणि राज्य शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमात कपात केली असतानाही शाळांकडून पूर्ण शुल्क भरण्यासाठी पालकांवर दबाव आणला जात आहे. टाळेबंदीमुळे पालकांची आर्थिक घडी विस्कटल्याने शुल्क भरण्यास उशीर झाल्यास ऑनलाइन वर्गाची ‘लिंक’ बंद करण्यात येईल अशी मुजोरी शाळांकडून सुरू आहे. विशेष म्हणजे शिक्षण विभागाच्या आशीर्वादामुळे खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा मनमानी कारभार सुरूच आहे.

कोरोना आणि टाळेबंदीमुळे यंदाचे शैक्षणिक क्षेत्राचे संपूर्ण वेळापत्रक विस्कटले आहे. शाळा बंद असल्या तरी शिक्षण थांबायला नको, अशी भूमिका घेत राज्य शासनाने ऑनलाइन वर्गांना अखेर परवानगी दिली. मात्र, खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी केवळ व्यावसायिक दृष्टिकोनातून शासनाच्या आदेशाआधीच जून महिन्यापासून ऑनलाइन वर्गांना सुरुवात केली. कोरोनामुळे मार्च महिन्यापासून शाळा बंद असल्या तरी शुल्क भरण्यासाठी पालकांवर दडपण आणले जात आहे.

मुख्यमंत्री असतानाच शिवाजीराव निलंगेकरांनी नागपूर विद्यापीठातून मिळविली होती ही पदवी...

कोरोनामुळे नवीन शैक्षणिक सत्र पूर्ण होणार नसल्याने अभ्यासक्रमात कपात करण्यात आली आहे. असे असतानाही शाळांनी शुल्कात कुठलीही कपात न करता उलट पूर्ण शुल्क भरण्यासाठी दडपण आले जात आहे. चार महिन्यांच्या टाळेबंदीमुळे पालकांची आर्थिक स्थिती विस्कटलेली आहे. त्यामुळे शाळांनी शुल्क भरण्यासाठी कुणावरही दबाव आणू नये, पालकांना यासाठी मुभा द्यावी अशा सूचना शालेय शिक्षण विभागाने शाळांना दिल्या. मात्र, यानंतरही शाळांचा मनमानी कारभार सुरूच आहे.

सध्या ऑनलाइन वर्ग सुरू असून, ज्या पालकांनी शुल्क जमा केले नसेल त्यांच्या पाल्यांची ऑनलाइन वर्गाची लिंक बंद केली जात आहे. शाळांच्या या मनमानी धोरणाविरोधात पालकांमध्ये प्रचंड रोष असून शिक्षण विभागाने यावर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Online education only if fees are paid