विरोधकांना काढले सभापतींनी कक्षाबाहेर

file photo
file photo

नागपूर : विरोधी पक्षनेत्यांसह सदस्यांना सभापतींनी कक्षाच्या बाहेर काढले. जिल्हा परिषदेच्या इतिहास पहिल्यांदाच अशा प्रकारची घटना झाली असून यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान विरोधकांनी जिल्हा परिषदच्या वऱ्‍हांड्यात पत्रपरिषद घेवून आपली गाऱ्‍हानी मांडली.

सत्ताधाऱ्यांकडून होत असलेल्या घोटाळ्याबाबत माहिती देण्यासाठी विरोधी पक्ष नेते अनिल निधान यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांच्यासोबत जि.प. सदस्य राजेंद्र हरडे, सुभाष गुजरकर, कैलास बरबटे, राधा अग्रवाल, मोहन माकडे, व्यंकट कारेमोरे आदी उपस्थित होत. समाजकल्याण सभापती नेमावटी माटे यांच्या कक्षात कुणीत नसल्याने पत्रकार परिषद सुरू केली.

दरम्यान माटे आल्या. तुमचे लवकर आटपा, असे त्या म्हणाल्या. थोड्यावेळा नंतर पुन्हा झाले का, असे म्हणत, कक्षा बाहेर जाण्याचा सल्ला दिला. त्यामुळे विरोधकांनी कक्षातून काढता पाय घेतला. जिल्हा परिषदेच्या वऱ्‍हांड्यातच पत्रकारांना माहिती दिली. विरोधी सदस्यांना बसायलाही जागा नाही, असा ओरड करीत, एका कक्षाचे कुलुप तोडण्याचाही प्रयत्न केला. विशेष म्हणजे यावेळी समाजकल्याण समिती सदस्य सुद्धा उपस्थित होते.


विरोधकांसाठी एक कक्ष द्यावा
विरोधी पक्षांच्या सदस्यांना बसण्यासाठी जागा नाही. समाजकल्याण सभापतींच्या कक्षात कुणीच नसल्याने बसलो. जिल्हा परिषद कुणाच्या मालकीची नाही. हा सदस्यांचा अपमान आहे. त्यांच्या वागणुकीचा आम्ही निषेध करतो. विरोधकांसाठी एक कक्ष द्यावा, अशी मागणी सीईओंकडे करणार आहे.
अनिल निधान, विरोधी पक्ष नेता


अध्यक्षांच्या कक्षातही अपमान
विरोधी पक्षाच्या सदस्या राधा अग्रवाल या एका कामासाठी अध्यक्षांच्या कक्षात गेल्या. अध्यक्षा नव्हते, पण त्यांचे पती तेथे होते. ते काही लोकांसोबत चर्चा करीत होते. त्यांच्या पतींनी महत्वाची बैठक सुरू असल्याने बाहेर जाण्यास सांगितल्या घटनेला अग्रवाल उजाळा दिला. अध्यक्ष नसताना त्यांच्या कक्षात त्यांचे पती बैठका कशा घेवू शकतात, असा सवाल त्यांनी केला.


एका कर्मचाऱ्याने उघडला कक्ष
सभापतींच्या कक्षातून विरोधक बाहेर आल्यानंतर कक्षाबाबत आरडा-ओरड केली. वऱ्‍हांड्यात पत्रकारांशी बोलताना दिसतात एका कर्मचाऱ्याने एक कक्ष उघड केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com