
नागपूर ः राज्य सरकारने प्लॅस्टिक बंदी केली असली तर शहरात मोठ्या प्रमाणात विक्री व वापर होत आहे. महापालिकेने जानेवारीमध्ये सव्वापाच टन प्लॅस्टिक जप्त केल्याने शहरात प्लॅस्टिक बंदीचा फज्जा उडाल्याचे स्पष्ट झाले. महाल, इतवारीसारख्या बाजारपेठ असलेल्या गांधीबाग झोनमध्ये सर्वाधिक पाच टन १३१ किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले.
प्लॅस्टिकवर बंदी असतानाही विक्री व वापर होत असल्याने मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी कारवाईचे आदेश दिले आहे. महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे दहाही झोनमध्ये ठिकठिकाणी धाडी टाकण्याचे सत्र नियमित सुरू आहे. उपद्रव शोध पथकाने जानेवारीत एकूण ५३१ दुकानांवर धाड घातली. यातील ४६ दुकानांतून ५ हजार २८७ किलो प्लॅस्टिक जप्त केले.
विक्रेत्यांकडून २ लाख ३० हजाराचा दंड वसूल करण्यात आला. उपद्रव शोध पथक प्रमुख विरसेन तांबे यांच्या नेतृत्वात दहाही झोनमधील पथकाद्वारे करवाई करण्यात आली. सर्वाधिक जप्तीची कारवाई महाल, इतवारीसारख्या बाजारपेठ असलेल्या गांधीबाग झोनमध्ये करण्यात आली. या झोनमध्ये ८० दुकानांवर धाड टाकली. यातील १४ दुकानांतून ५१३१ किलो प्लॅस्टिक जप्त करून त्यांच्याकडून ७० हजाराचा दंड वसूल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे इतर नऊ झोनमधून केवळ १५६ किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले. मात्र, या नऊ झोनमधून सर्वाधिक १ लाख ६० हजारांचा दंड वसूल करण्यात आला.
झोननिहाय कारवाई
झोन आणि जप्त प्लास्टिक
लक्ष्मीनगर -- ८ किलो
धरमपेठ -- ७४ किलो
हनुमाननगर -- ८ किलो
धंतोली -- २४ किलो
नेहरूनगर -- ५ किलो
गांधीबाग -- ५१३१ किलो
सतरंजीपूरा -- १७ किलो
लकडगंज -- ११ किलो
आशीनगर -- ९ किलो
एकूण -- ५२८७ किलो
संपादन - अथर्व महांकाळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.