एकदाचे उघडणार बारचे शटर! मात्र केवळ घरपोच सेवा

wine bar
wine bar

नागपूर : गेल्या सव्वा दोन महिन्यापासून बंद असलेले बिअरबारचे शटर उघडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी बार सुरू करण्यास परवानगी दिली आहे. आवश्यक कारवाई पूर्ण केल्यानंतर दोन तीन दिवसात बिअरबार सुरू होतील. परंतु येथे बसून दारू पिता येणार नसल्याचे उत्पादन शुल्क अधीक्षक प्रमोद सोनोने यांनी सांगितले.
कोरोनाच्या नियंत्रणासाठी वाईन शॉपसोबत बिअरबार बंद करण्यात आले होते. नागपूर जिल्ह्यात १८ मार्चपासून दारू विक्री बंद आहे. सरकारच्या आदेशानंतर दारू विक्री सुरू करण्यात आली. शहरात घरपोच तर ग्रामीण भागात दुकानातून विक्रीस परवानगी आहे. आता बिअरबारमधून दारू विक्री होणार आहे. शासनाच्या सहमतीनंतर जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी बार सुरू करण्यास परवानगी दिली. सव्वा दोन महिन्यात जिल्ह्यातील बिअरबारचे शटर उघडणार आहे. बिअरला एक्सपायरी डेट आहे. बार बंद असल्याने या बिअर खराब होण्याची भीती आहे. यामुळे सरकारने हा निर्णय घेतल्याचे समजते. परंतु  बारमध्ये बसून दारू पिता येणार नाही. शहरीभागात घरपोच दारू विक्री होईल तर ग्रामीण भागात दुकानातून याची विक्री होईल.

सविस्तर वाचा - वस्त्रनिर्मिती व्यावसायिकांना अंतरिम दिलासा नाकारला
तपासणीनंतरच मिळणार परवानगी
एमआरपीनुसारच याची विक्री होणार असून बार सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंतच सुरू राहतील.बंद करतेवेळी जो साठा बारमध्ये होता, त्यालाच विक्रीची परवानगी राहणार आहे. बार चालकांकडून आलेल्या अर्जानंतर आवश्यक तपासणी केल्यावरच त्यांना विक्रीची परवानगी देण्यात येईल. याला दोन, तीन दिवस लागतील.
प्रमोद सोनूने
अधीक्षक उत्पादन शुल्क विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com