देशीकट्ट्यातून सुटल्या गोळ्या...पैशांसाठी होता वाद

Pills released from homeland ... was a dispute for money
Pills released from homeland ... was a dispute for money

बेला :  उधार दिलेले पैसे परत मागण्यासाठी तगादा लावल्यामुळे मनात राग धरून आरोपीने पोपटलाल डवरे(वय52, केसलापार) यांच्यावर बंदुकीच्या दोन गोळ्या झाडून त्यांच्या खुनाचा प्रयत्न केला. सुमारे अठरा तास घटनास्थळी निपचीत पडलेल्या डवरे यांना नागपूर येथील ऑरेंज सिटी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या अत्यवस्थ आहे.


घटनेतील आरोपी अमोल दिलीप बोंडे (वय30, चारगाव, ता.उमरेड) या आरोपीला पोलिसांनी अटक केली असून इतर दोन आरोपी अनिल गायकवाड (सातगाव) व वैभव उर्फ गोल्डी नारनवरे हे पसार आहेत. जखमीने आरोपी अमोल यास एक महिन्यापूर्वी उसने पैसे दिले होते. ते परत मागण्यासाठी त्याने तगादा लावला होता. त्यामुळे आरोपीने डवरे यांच्याविरुद्ध त्याने मनात राग धरला होता. त्यातून पैसे देण्यासाठी आरोपीने डवरे यांना 25 फेब्रुवारीला पैसे घेण्याकरीता वडगाव डॅम शिवारात बोलाविले. त्यावेळी देशीकट्टा बंदुकीच्या दोन गोळ्या आरोपींनी डवरे यांच्यावर झाडल्या व त्यांच्यावर लोखंडी रॉड देशीकट्‌टयाच्या मुठीने वार केले. या हल्ल्यात बेशुद्ध होऊन डवरे निपचित पडले असता मृत समजून आरोपी पसार झाले. दरम्यान, घरी न आल्याची तक्रार( बेपत्ता) कुटुंबियांनी दिल्यामुळे रात्री अडीच वाजेपर्यंत बेला व बुटीबोरी पोलिसांनी शोध घेतला. दुस-या दिवशी सकाळी आठ वाजता पोलिसांना जखमी अवस्थेत डवरे डॅम शिवारात आढळले. याबाबत अधिक सखोल तपास केला असता पैशाच्या कारणाने आरोपी अमोल बोंडे याने इतर दोन साथीदारासह पोपटराव यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याचे निष्पन्न झाले. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सायबर सेलच्या मदतीने समांतर तपास सुरू करून आरोपींचा शोध घेतला असता आरोपी अनिल भानुदास गायकवाड हा अजनी परिसरातील रामेश्‍वरी भागात सापडला. आरोपी वैभव उर्फ गोल्डी नारनवरे याला प्रतापनगर परिसरातील सुभाषनगर वस्तीतून ताब्यात घेण्यात आले. त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी दोन्ही आरोपींना बेला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

असा काढला वचपा

उसनवारी घेतलेले पैसे परत करत नसल्यामुळे पोपटराव डवरे हे वारंवार पैशांकरीता तगादा लावत होते. वारंवार घरी येवून चारचौघात अपमान करीत होते. याचा बदला घेण्याच्या उद्देशाने त्यांना जिवानिशी ठार मारण्याचा कट रचण्यात आला. त्याकरीता अनिल गायकवाड व वैभव उर्फ गोल्डी नारनवरे (डोंगर्ला, ता.तुमसर, जिल्हा भंडारा) या दोघांच्या मदतीने देशीकट्टा जमवून मंगळवारी (ता.25)फोन करून डवरे यांना बोलावून घेतले व वचपा काढल्याचे पोलिसांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com