योजना आली, नियोजन झाले, मग कुठे गेले पाणी?

 कोदामेंढी :  गावातील आटलेली आणि फ्लोराइडयुक्त पाण्याची विहीर.
कोदामेंढी : गावातील आटलेली आणि फ्लोराइडयुक्त पाण्याची विहीर.
Updated on

कोदामेंढी (मौदा) : उन्हाळ्याची चाहूल लागताच रेवराल येथील नागरिकांना पाणीटंचाईच्या भीषण समस्यांचा सामना करण्याची वेळ आली. दोन महिन्यांपूर्वी 97 लाखांचे पाणीपुरवठा योजचे काम पूर्णत्वास आले. कंत्राटदाराने पाणीपुरवठा योजना ग्रामपंचायत प्रशासनाकडे सोपविली, तरीही पाणीटंचाईला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.
क्‍लिक करा  : नागपूर हादरले, भिंतींना तडा, सगळीकडे खळबळ

नळजोडण्या अद्याप नाही; सरपंचांना दिले निवेदन
सुमारे चार हजार लोकवस्तीचे रेवराल गाव. गावात पिण्याच्या पाण्यासाठी हातपंप, सार्वजनिक विहिरी आहेत. मात्र, येथे फ्लोराईडयुक्त पाण्याचा स्रोत असल्याने पाणी पिण्यास अयोग्य आहे. त्याचबरोबर पाण्याची पातळी खोलवर गेल्याने विहिरीत ठणठणाट आहे. त्यामुळे गावाला पाणीपुरवठा करण्याकरिता पाच किलोमीटर अंतरावरून धर्मापुरी येथील सुरनदीच्या पात्रात पाणीपुरवठ्याची विहीर करण्यात आली. येथील ग्रामपंचायत प्रशासनाने ग्रामस्थांना अद्याप नळाचे कनेक्‍शन वाटप केले नसल्याने आम्ही पाणी प्यावे कुठले, असा सवाल करीत काही महिला आणि पुरुष ग्रामपंचायत कार्यालयावर धडकले आणि सरपंच चिंतामण मदनकर यांना निवेदन दिले. तसेच आठ दिवसांत यावर तोडगा न काढल्यास ग्रामपंचायत समोर उपोषणावर बसण्याचे संकेत दिले. यावेळी दुर्गा वंजाळकर, मीना गिरी, सविता कोठे, सुषमा सेलोकर, कांता धांडे, मनीषा पातोडे, प्रिया गिरी, माधुरी आगाशे, सागर भाजीपाले, नरेश आस्वले, श्रीमोहन धांडे, बबन लेदे, विशाखा वयले, राधेलाल मेश्राम, बबलू डायरे आदींसह होते.


जीव धोक्‍यात घालण्याची वेळ
गावात पाण्याची समस्या आणि पर्यायी व्यवथा नसल्यावरदेखील येथील प्रशासनाने कर, डिमांड भरण्याची आणि काही अटी लादल्याने ग्रामस्थांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. ठिकठिकाणी सिमेंट रस्ते आणि पाण्याची मुख्य पाइपलाइन लांब अंतरावर असल्याने नळ कनेक्‍शन घेताना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. शासन निर्णयानुसार पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी सार्वजनिक नळ जोडण्या देणे बंद करण्यात आले आहे. त्यामुळे घरगुती जोडण्या देणे गरजेचे झाले आहे. नळजोडण्या न मिळाल्यास फ्लोराईडयुक्त पाणी पिऊन आरोग्य धोक्‍यात घालण्याची वेळ येथील ग्रामस्थांवर आलेली आहे.

पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे
फ्लोराईडयुक्त पाणी पिल्याने शरीराचे मणके वाकडे होऊन दुखतात. दात पिवळे होतात. दातांची रचना बिघडते. जास्त वापर झाल्यास आरोग्यावर विपरीत परिणाम जाणवतो. याकरिता पिण्याच्या पाण्याची पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे आहे.
रुपेश नारनवरे, तालुका आरोग्य अधिकारी मौदा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com