esakal | रात्री गस्त घालत होते पोलिस; मैदानात अंधारात चमकली वस्तू आणि झाला भांडाफोड

बोलून बातमी शोधा

The plan to rob the bullion shop failed Nagpur crime news}

गस्त करताना पोलिस पथक यादवनगर येथे आले. त्यावेळी रात्रीच्या अंधारात काही जण बसून असल्याचे दिसून आले. पोलिसांनी चहूबाजूंनी घेराव घालून धाड घातली. त्यावेळी चौघे पोलिसांच्या जाळ्यात अडकले. इतर एकदोघे अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले.

रात्री गस्त घालत होते पोलिस; मैदानात अंधारात चमकली वस्तू आणि झाला भांडाफोड
sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : रात्रीच्या अंधारात बसून सराफाचे दुकान फोडण्याच्या योजना करीत असलेल्या एका टोळीला सापळा रचून अटक करण्यात यशोधरानगर पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश उर्फ सोनू राजकुमार कुसेरे (२४, रा. बारानल चौक, यशोधरानगर), हिमांशू मोहन सोरते (२०, रा. कांजी हाऊस चौक), रूपेश ऊर्फ नव्वा धनराज येनुरकर (२४, रा. कुंदनलाल गुप्तानगर) आणि राहुल राजू हटेवार (२०, रा. कुंदनलाल गुप्तानगर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

अधिक वाचा - ‘मुलांनो, आम्हाला माफ करा; आमचे मृतदेह मेडिकल कॉलेजला दान करा’ अशी चिठ्ठी लिहून दाम्पत्याची आत्महत्या

रविवारच्या पहाटे दोन वाजताच्या सुमारास चारही आरोपी सहकाऱ्यांसह यादवनगर येथील स्विपर कॉलनीतील बंद वाचनालयाच्या मोकळ्या मैदानात तीक्ष्ण शस्त्रांसह बसले होते. त्यावेळी ते यादवनगर येथील सौरभ ज्वेलर्सचे दुकान फोडण्याच्या तयारीत होते. त्याचवेळी गुन्हे प्रकटीकरण विभागाचे उपनिरीक्षक जितेंद्र भार्गव, सहायक उपनिरीक्षक प्रकाश काळे, विनोद सोलव, दीपक धानोरकर, अक्षय सोरदे आणि इतर कर्मचारी हे रात्रगस्त करीत होते.

गस्त करताना पोलिस पथक यादवनगर येथे आले. त्यावेळी रात्रीच्या अंधारात काही जण बसून असल्याचे दिसून आले. पोलिसांनी चहूबाजूंनी घेराव घालून धाड घातली. त्यावेळी चौघे पोलिसांच्या जाळ्यात अडकले. इतर एकदोघे अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले.

अधिक माहितीसाठी - वनमंत्री राठोडांच्या समर्थनार्थ पुसदमध्ये निघणाऱ्या मोर्चाचा उडाला फज्जा; बंजारा समाजाकडून प्रतिसादच नाही

पोलिसांनी पकडलेल्या आरोपींची अंगझडती घेतली असता त्यांच्याजवळ दोन तलवारी, मोठा चाकू, मोबाईल आणि पल्सर दुचाकी असा मुद्देमाल मिळून आला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून चौघांनाही अटक केली. पळून गेलेल्या आरोपींचा शोध सुरू आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक मेश्राम आणि पो. नि. (गुन्हे) स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.