Video : नावालाच 'सुपर'; येथे चालतो रुग्णांच्या जिवाशी खेळ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 जानेवारी 2020

सुपरची ओपीडी (बाह्यरुग्ण विभाग) "हाउसफुल्ल' असल्यामुळे येथे रुग्णांना प्रतीक्षा करण्यासाठी जागाही उपलब्ध नसते. यामुळे रुग्ण बाहेर उभे असतात. ओपीडीची जागा बदलण्याची खरी गरज आहे. सुपरमधील बाह्यरुग्ण विभागात सोमवारी न्यूरोलॉजी, कार्डिओलॉजी, सीव्हीटीएस, न्यूरो सर्जरी विभागाचा बाह्यरुग्ण विभाग असतो. यामुळे या दिवशी सुपरच्या बाह्यरुग्ण विभागात रुग्णांची तोबा गर्दी उसळते. 

नागपूर : मेडिकलशी संलग्न सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये बाह्यरुग्ण विभागात दर दिवसाला रुग्णांची प्रचंड गर्दी वाढत आहे. मात्र, यावर उपाययोजना होत नसल्यामुळे या गर्दीला आवरता येत नाही. विशेष असे की, गर्दीतील रुग्णांनी किती वेळ रांगेत उभे राहायचे, असा सवाल करीत या रांगेत कार्डाची प्रतीक्षा करीत मरायचे का? अशी व्यथा बोलून दाखवली. कार्ड काढण्यासाठी दोन तास उभे राहिल्यानंतर उपचारासाठी किती तास उभे राहायचे, असा सवालही रुग्णांनी केला. सोमवारी दोन रुग्ण भोवळ येऊन पडल्याची चर्चा येथे होती. 

अवश्य वाचा - आता सापांनाच म्हणावे लागेल 'सर्पमित्रांना बोलवा'!, कारण वाचून व्हाल अवाक

सोमवारी (ता. 6) सुपर स्पेशालिटीत हृदयरोग विभागासह मेंदुरोग विभागाच्या बाह्यरुग्ण विभागात रुग्णांची सुमारे पन्नास मीटरपेक्षा जास्त रांग लागली होती. यामुळे येथे हृदयरोग विभागात आलेल्या आणि रांगेत शेवटी असलेल्या रुग्णांचा नंबर तब्बल तीन तासांनंतर लागतो. यामुळे रुग्णांना भोवळ येऊन खाली पडण्यासोबतच इतरही त्रास होत असल्याची व्यथा रुग्णांनी व्यक्त केली. 

येथे कार्यरत डॉक्‍टरांची संख्या कमी आणि रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सुपरची ओपीडी (बाह्यरुग्ण विभाग) "हाउसफुल्ल' असल्यामुळे येथे रुग्णांना प्रतीक्षा करण्यासाठी जागाही उपलब्ध नसते. यामुळे रुग्ण बाहेर उभे असतात. ओपीडीची जागा बदलण्याची खरी गरज आहे. सुपरमधील बाह्यरुग्ण विभागात सोमवारी न्यूरोलॉजी, कार्डिओलॉजी, सीव्हीटीएस, न्यूरो सर्जरी विभागाचा बाह्यरुग्ण विभाग असतो. यामुळे या दिवशी सुपरच्या बाह्यरुग्ण विभागात रुग्णांची तोबा गर्दी उसळते.

Image result for super speciality hospital nagpur

प्रशासनाने केली डोळेझाक

सुपरमध्ये एक हजारापेक्षा जास्त रुग्णांची नोंद होते. डॉक्‍टरांची संख्या कमी असते. यामुळे येथे रुग्ण दिवसभर उपचाराच्या प्रतीक्षेत असतात. जागा नसल्यामुळे कोणी चहाटपरीवर तर कोणी बाहेरच्या पटांगणात आराम फर्मावत असतात. मात्र, बाह्यरुग्ण विभागात कार्ड काढण्यासाठी तब्बल पाचशे रुग्ण प्रतीक्षेत असतात. याकडे प्रशासनाने मात्र डोळेझाक केली आहे. 

एक खिडकी वाढवा

सोमवारी गर्दी लक्षात घेता रुग्णांना त्वरित कार्ड उपलब्ध व्हावे, या हेतूने अतिरिक्त संगणक लावण्याची सोय करावी. एक खिडकी वाढवण्यात यावी, अशी मागणी सिव्हिल ह्युमन राइट प्रोटेक्‍शन असोसिएशनतर्फे करण्यात आली आहे.

अवश्य वाचा - वडिलांच्या प्रेमाला मुकल्याने तीने केले असे...

अन्यथा मानवाधिकार आयोगाकडे तक्रार

अतिरिक्त खिडकी न उघडल्यास रुग्णांची सुपर स्पेशालिटीत हेळसांड होत असल्याचे कारण पुढे करीत राज्याच्या मानवाधिकार आयोगाकडे असोसिएशनतर्फे तक्रार करण्यात येईल, असे कळविण्यात आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Playing with patients life in super