पैसे न दिल्यास तुझा गेम करणार... काय आहे प्रकरण? 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 ऑगस्ट 2020

भूखंडाची रजिस्ट्रीसुद्धा गोलू मलियेकडे ठेवण्यात आली होती. उधार घेतलेली रक्‍कम देण्यास टाळाटाळ करणाऱ्या राहुलला सर्व आरोपींनी मारहाण केली. राहुलवर भूखंड विकण्यासाठी दबाव टाकला. राहुलसह त्याच्या आईला पिस्तुलाचा धाक दाखविण्यात आला. 

नागपूर नागपुरात गुन्हेगारी वाढली आहे. रोज गुन्ह्याच्या घटना घडत आहेत. पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहिला नाही, असे नागरिक बोलू लागले आहेत. व्याजाने अडीच लाख रुपये उधार दिल्यानंतर आरोपींनी धमकी देऊन व्यक्‍तीचा भूखंड हडपला. ही घटना नुकतीच उघडकीस आली.

माटे चौक निवासी विमल दिनेश काळमेघ (वय ५२) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपींमध्ये तपन जयस्वाल (भेंड ले-आउट), रमेश जयस्वाल, निखिल ऊर्फ गोलू मलिये, रवी ऊर्फ अण्णा आणि अन्य एका युवकाचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विमल काळमेघ यांचा मुलगा राहुल याने मार्च २०१३ मध्ये तपनकडून १७.५ टक्‍के व्याजदराने अडीच लाख रुपये घेतले होते. ३५ हजार रुपये महिन्याकाठी किस्त देण्याचा करार करण्यात आला होता. 

सलग तीन महिन्यांपर्यंत राहुलने किस्तीचे पैसे दिले नाही. त्या बदल्यात तपनने आयडीबीआय बॅंकेचा कोरा धनादेश आणि एका कागदावर रेव्हेन्यू स्टॅम्प पेपर लावून सही घेतली होती. भूखंडाची रजिस्ट्रीसुद्धा गोलू मलियेकडे ठेवण्यात आली होती. उधार घेतलेली रक्‍कम देण्यास टाळाटाळ करणाऱ्या राहुलला सर्व आरोपींनी मारहाण केली. राहुलवर भूखंड विकण्यासाठी दबाव टाकला. राहुलसह त्याच्या आईला पिस्तुलाचा धाक दाखविण्यात आला. 

हेही वाचा - पालकमंत्री राऊत म्हणाले, स्मार्ट ॲक्शन प्लॅन तयार करा 

तपनने राहुलला पिस्तूल दाखवली तर विमल आणि राहुल यांच्याकडून १७ मार्च २०२० ला सेल डीड करण्यास दबाव टाकला. व्याजाचे पैसे कापून काळमेघ यांना १० लाख रुपये देण्यात आले. यानंतरही गुंड गोलू मलिये १.६५ लाखाची रक्‍कम व्याज म्हणून मागत होता. ही रक्‍कम न दिल्याने प्रतिमहा ३५ हजारांची मागणी केली. पैसे न दिल्यास गेम करण्याची धमकी दिली. या प्रकरणी बजाजनगर पोलिसांनी वेगवेगळ्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The plot was grabbed by threatenung