भूषणावह... 'एक हाथ में डंडा दुसरे में प्यार', कुणी हीट ठरविले हे वाक्य...

Police Commissioner Dr. Bhushan Kumar Upadhyay's admirable performance
Police Commissioner Dr. Bhushan Kumar Upadhyay's admirable performance

नागपूर : पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ मोठमोठ्या कारवायांनी गाजला. आयुक्तांनी तब्बल ५० गुंडांवर तडीपारीची तर ११७ गुंडांना कारागृहात धाडले. शहरातील मुख्य ड्रग्स माफियांवर नियंत्रण ठेवत तरुणाईला त्यापासून वाचविले. गुन्हेगारांत धाक निर्माण करून त्यांनी सामान्य नागरिकांसाठीही शहरात सुरक्षित वातावरण निर्माण केले.

पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांचा जवळपास दोन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. या दोन वर्षात त्यांनी उपराजधानीतील गुंडगिरी मुळासकट उपटून काढण्यावर भर दिला. पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्या कार्यकाळात गुन्ह्यांमध्ये ३० टक्क्यांनी घट झाली. हे त्यांच्या कार्यकाळातील मोठे यश असल्याचे म्हटले जाते. पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांचे 'एक हाथ में डंडा दुसरे में प्यार, तुझे क्या चाहिए बता मेरे यार' हे ब्रीदवाक्य सर्वाधिक हीट ठरले.

दोन वर्षात याप्रमाणेच त्यांची कार्यशैली राहिली. प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हददीत क्राईम ईंटेलिजेन्स युनिट बनवून शहरातील गुन्हेगारांवर नजर केंद्रित केली. नागपूरला ड्रग्स फ्री सीटी बनविण्यासाठी त्यांनी आबू खानसारख्या कुख्यात माफियाच्या मुसक्या आवळल्या. त्याप्रमाणे नशामुक्त शहर अभियानांतर्गत १९५ कारवाई करून एकूण २८९ आरोपींना अटक करून त्यांच्या जवळून एकूण ३ कोटी ८१ लाख ३८ हजार ७६६ रुपयांचा माल जप्त करण्यात आला.
 

१८ हजार जणांवर कारवाई


पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी आपल्या कार्यकाळात अनेक गुन्ह्यांना रोखण्यासाठी विशेष पावले उचलली. जुलै २०१८ ते जुलै २०२० पर्यंत त्यांनी ५० गुन्हेगारांवर एमपीडीए लावून त्यांची कारागृहात डांबले. २० पेक्षा अधिक गँगवारच्या कारवाईत ११७ आरोपींना अटक करून त्यांच्यावर मकोका लावण्यात आले. खुनाच्या प्रकरणात १ हजार १२१, प्रतिबंधित कारवाईत १६ हजार ७१२ आरोपींना अटक करण्यात आली. याशिवाय ऑपरेशन क्रॅकडाऊन, ऑपरेशन व्हॉईप आऊट, इंटेलिजंस पथक, हिट स्कॉड, ऑपरेशन स्ट्रीट ड्राइव्हसह अनेक अभियानाद्वारे अनेक गुन्हेगारांची धरपकड करण्यात येत आहे. एकूणच सीपींच्या आदेशानुसार १८ हजार २८९ पेक्षा अधिक आरोपींवर कारवाई करण्यात आली.
 

आंबेकरच्या दहशतीचा अंत


शहर पोलिस आयुक्त म्हणून डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी पदभार सांभाळल्यानंतर संतोष आंबेकरच्या गुन्ह्याची फाईल त्यांनी काढली. यात अनेक प्रकरणे उघडकीस आली. त्याला अटक करण्याचे आदेश जारी केले आणि लोकांमधील त्याच्याविषयीची भीती दूर केली. याशिवाय न्यायालयापर्यंत त्याची पायदळ मिरवणूकही काढली. शहरात हे सर्व प्रथमच घडले. तर एमपीडीए लावून त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली.
 

मंगेश, राठोड, प्रीती ते सय्यद साहिलपर्यंत


नोकरी लावून देण्याच्या नावावर लोकांना लुटणाऱ्या महाठगबाज प्रीती दासचा भंडाफोड करण्यात आला. पोलिस अधिकाऱ्याशी ओळख असल्याने त्यांचा धसका दाखवून प्रीतीने अनेकांना गंडविले. यात काही पोलिस अधिकाऱ्यांनाही तिने ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. प्रीतीला अटक करून तिची कारागृहात रवानगी करण्यात आली. यानंतर काही पोलिस अधिकाऱ्यांचाही त्यांनी चांगलाच 'क्लास' घेतला. प्रीतीनंतर खंडणीखोर मंगेश कडव, वादग्रस्त नेता साहिल सैय्यद, युवासेनेचा विक्रम राठोड, शिवसेनेच्या संज्योत राठोडच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. 

संपादन : अतुल मांगे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com