वेकोलि अधिका-याचा आफ्रिकन पोपट उडाला... किंमत वाचून तुम्हालाही बसेल धक्का

Police find a missing parrot in Nagpur
Police find a missing parrot in Nagpur

नागपूर : अनेकांना कोणता ना कोणता प्राळीव प्राणी पाळण्याचा छंद असतो. तसेच अनेकांना प्राण्यांवर विशेष प्रेम असल्यामुळे ते विविध प्राणी पाळत असतात. यात श्‍वान, मांजर, पोपट यांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. या प्राण्यांची काळजी घेण्यापासून सुरक्षेपर्यंतचे सर्व सोय मालक करीत असतात. यासाठी मोठ्या प्रमाणात पैसेही खर्च करतात. त्यांना आपल्या मुलांप्रमाणे जपतात. त्यांच्यासाठी काहीही करायची तयारी प्राणी मालकांची असते. अशाच एका प्राणी मालकाने थेट पोलिस ठाणे गाठल्याची घटना नागपुरात घडली. 

सर्वात विश्‍वासू प्राणी म्हणून श्‍वानाकडे बघितले जाते. श्‍वान हा समजदार प्राणी असल्यामुळे त्याला ही महती मिळाली आहे. अनेक चित्रपटांमध्ये आपण श्‍वानाचे महत्त्व बघितले आहेत. तसेच पोलिस देखील प्रकरणाचा छळा लावण्यासाठी श्‍वानांचा वापर करीत असतात. तसेच पोपटसुद्धा अनेकांचा प्रिय असतो. अनेक चित्रपटांमध्ये आपण पोपटाचा अभिनय बघितला आहे. पोपट बोलत असल्याने त्याचे आकर्षण वेगळेच असते. 

वेकोलिच्या एका अधिकाऱ्याने घरी पोपट पाळला होता. सर्वांचा लाडका असलेला पोपट अचानक घरातून निघून गेला. त्यामुळे घरच्यांनी इकडे-तिकडे पोपटाचा शोध घेणे सुरू केले. मात्र, सायंकाळपर्यंत पोपट काही त्यांना मिळाला नाही. निराश झालेले अधिकारी थेट मानकापूर पोलिस ठाण्यात पोहोचले. त्यावेळी नेहमीच घाई आणि गर्दी असलेल्या स्टेशन डायरीवर ते गेले. "साहेब माझा पोपट हरवलाय!' असे सांगून लगेच लेखी आणलेली तक्रार पोलिसांना दिली. यामुळे उपस्थितांना आश्‍चर्याचा धक्‍का बसला.

प्रकरण थोडे वेगळे असल्यामुळे स्टेशन डायरी अधिकाऱ्याने ही बाब पोलिस निरीक्षकांच्या कानावर टाकली. पोलिस निरीक्षकांनाही आश्‍चर्य वाटले. परंतु, त्या अधिकाऱ्याला तक्रार दाखल करायची असते. त्यावर ते ठाम होते. शेवटी पोलिस नाईलाजास्तव पोलिस स्टेशन डायरीमध्ये पोपट हरविल्याची नोंद केली. 

अधिकारीसुद्धा बुचकळ्यात

मिसिंग दिलेल्या तक्रार अर्जावर पोलिस निरीक्षक हे ठाण्यातील पोलिस अधिकारी आणि पोलिस कर्मचाऱ्यांना पोपटाचा त्वरित शोध घ्यावा, असा शेरा मारतो आणि ती तक्रार स्टेशन डायरी अधिकाऱ्याला देतो. तो अधिकारीसुद्धा बुचकळ्यात पडतो. आता पोपटाला शोधायचे कसे? कुठे असेल पोपट? कुणी अपहरण तर केले नाही ना? मग शेवटी तो अधिकारी चार पोलिस कर्मचारी घेऊन ठाण्याबाहेर पडतो. 

अशाप्रकारे होतो प्रकरणाचा अखेर

चार पोलिस कर्मचारी रात्री नऊ वाजेपर्यंत पोपटाचा शोध घेतात. शेवटी परतीच्या वेळी पोलिसांना पोपट आढळतो. पोलिस पोपटाला ताब्यात घेतात आणि पोलिस ठाण्यात आणतात. तक्रारदार अधिकाऱ्याला फोन करून बोलविण्यात येते. "युनिक' असलेल्या प्रकरणाचा सर्वांनाच आनंद होतो. अशाप्रकारे मिसिंग झालेल्या पोपटाच्या तपासाचा अखेर होतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com