नागपुरात गुन्हा दाखल झाला अन् पोलिस निरीक्षकानं नाशकातून काढला पळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

police inspector arvind bhole escape from nashik after FIR registered in nagpur

भोळे याने एका विधवा महिलेला आपल्या जाळ्यात ओढून तिच्याशी वर्धा जिल्ह्यातील एका मंदिरात लग्न केले. चार महिने त्या महिलेसोबत त्याने काढले. दरम्यान, पत्नीच्या उपचारासाठी त्यांनी त्या महिलेकडून एक लाख रुपये उकळले.

नागपुरात गुन्हा दाखल झाला अन् पोलिस निरीक्षकानं नाशकातून काढला पळ

नागपूर : एका विधवा महिलेवर बलात्कार करून अश्‍लील व्हिडिओ काढल्याप्रकरणी गिट्टीखदान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिस निरीक्षक अरविंद भोळेने नाशिकमधून पळ काढला. गुन्हा दाखल होऊन चार दिवसांचा कालावधी उलटल्यानंतरही पोलिसांचे पथक अद्याप रवाना झाले नाही, त्यामुळे आश्‍चर्य व्यक्त केल्या जात आहे. 

हेही वाचा - भूक लागली आहे, जेवण कुठं मिळेल जी? खासगी रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाइकांची पायपीट

भोळे याने एका विधवा महिलेला आपल्या जाळ्यात ओढून तिच्याशी वर्धा जिल्ह्यातील एका मंदिरात लग्न केले. चार महिने त्या महिलेसोबत त्याने काढले. दरम्यान, पत्नीच्या उपचारासाठी त्यांनी त्या महिलेकडून एक लाख रुपये उकळले. महिलेच्या नकळत तिच्या तीन लाखांच्या सोन्याच्या बांगड्या देखील नेल्या. १८ फेब्रुवारी रोजी महिलेला एकटी सोडून भोळे नाशिकला निघून गेले. तीन दिवसात येतो असे त्यांनी महिलेला सांगितले होते. तीन दिवस होऊनही भोळे न आल्याने तिने त्यांच्या मोबाईलवर संपर्क केला. त्यावेळी तिचा क्रमांक त्यांनी ब्लॉक केल्याचे लक्षात आले. त्याचप्रमाणे आपल्या मित्रांना फोन करून महिलेला तिच्या आईवडिलांकडे जाण्यास सांगितले. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

हेही वाचा - ९ वर्षांच्या मुलाला चावला कुत्रा अन् मालकिणीला तब्बल ६...

रजेवरून थेट लंपास - 
तीन दिवसाची रजा टाकून भोळे नाशिकला निघून गेला. त्यानंतर त्याने नियंत्रण कक्षाचे ड्यूटी रायटरच्या व्हॉट्सअ‍ॅपवर आजारी रजा घेत असल्याचे कळविले. भोळेचा मोबाईल बंद आहे. मोबाईल बंद असल्याने भोळे याचे लोकेशन मिळत नाही असे गिट्टीखदान पोलिस सांगत आहेत. चार दिवस होऊनही पोलिसांना त्यांचे लोकेशन शोधता आले नाही. यावरून शहर पोलिस भोळे यांना पाठीशी घालत असल्याची चर्चा होती. 

loading image
go to top