कोरोनामुळे त्या पोलिसाचा मृत्यू?

केवल जीवनतारे
Thursday, 6 August 2020

पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अधिक सतर्कता बाळगावी आणि कोरोनाचे लक्षण दिसल्यास तत्काळ कोरोना चाचणी करून घ्यावी, असं आवाहन पोलिस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय आणि अतिरिक्त पोलिस आयुक्त निलेश भरणे यांनी केलं आहे.

नागपूर : नागपूर जिल्हा आता कोरोनाग्रस्त झाला आहे. जुलैपासून सुरू झालेले मृत्यू सत्र थांबता थांबत नाही. कोरोना काळात आपले कर्तव्य चोख बजावणारे अनेक पोलिसही कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत इतकेच नव्हे तर उपराजधानीत प्रथमच पोलिस मुख्यालयाचे उपनिरीक्षकासह नायक पदावर असलेला पोलिस कोरोनाच्या बाधेने दगावले आहेत.

याशिवाय नागपुरात एक वनरक्षकही कोरोनाचा बळी ठरला आहे. या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांसह वनविभागातील कर्मचाऱ्यावर नागपुरातील मेडिकलमध्ये उपचार सुरू होते. या घटनेमुळे नागपुर पोलिस दलासह वनविभागात एकच खळबळ उडाली आहे.

नागपुरात ही दुःखद घटना गुरूवारी (ता.६) घडली. दुःखद घटनेनंतरही खाकी वर्दी कर्त्यव्यावर आहे. दरम्यान पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अधिक सतर्कता बाळगावी आणि कोरोनाचे लक्षण दिसल्यास तत्काळ कोरोना चाचणी करून घ्यावी, असं आवाहन पोलिस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय आणि अतिरिक्त पोलिस आयुक्त निलेश भरणे यांनी केलं आहे.

सविस्तर वाचा - Video : आता तरी बरस रे! शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत, तीस टक्के रोवणी बाकी

राज्यात कोरोनाचा कहर अद्याप कमी होण्याचं नाव घेत नाही आहे. नागपुरात कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाच नागपूर पोलिस दलातील एक दु:खद बातमी समोर आली आहे. पोलिस उपनिरीक्षकासह हेड कॉन्स्टेबलचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने पोलिसांमध्ये शोकाकुल वातावरण पसरले आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातील अवघ्या पाच दिवसांमध्ये कोरोनाने ६६ जणांचा मृत्यू झाला आहे. यात नागपुरातील एका कलावंताचाही बळी घेतला. तर पाच दिवसात दीड हजारापेक्षा अधिक जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. ५ ऑगस्ट रोजी एकाच दिवशी ६५८ जण कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत.

संपादन - स्वाती हुद्दार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police man died due to corona